शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी : स्थायी समितीच्या निर्णयांची न्यायालयीन चौकशी करा, मारुती भापकर यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 05:01 IST

स्वच्छ व पारदर्शक कारभाराची हमी देताना सत्ताधारी भाजपाने ऐनवेळचे विषय घेणार नाही, मुदतवाढीचे विषय मंजूर करणार नाही, थेट पद्धतीने कामे देणार नाही, सल्लागार नियुक्तीवर बंधने आणणार, अधिकारी-नगरसेवक-सल्लागार-ठेकेदार यांच्या साखळ्या उद्ध्वस्त करणार अशा वल्गना केल्या. मात्र...

पिंपरी : स्वच्छ व पारदर्शक कारभाराची हमी देताना सत्ताधारी भाजपाने ऐनवेळचे विषय घेणार नाही, मुदतवाढीचे विषय मंजूर करणार नाही, थेट पद्धतीने कामे देणार नाही, सल्लागार नियुक्तीवर बंधने आणणार, अधिकारी-नगरसेवक-सल्लागार-ठेकेदार यांच्या साखळ्या उद्ध्वस्त करणार अशा वल्गना केल्या. मात्र, त्या उलट कारभार केल्याने वर्षभराच्या कालखंडातील निर्णयांची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.गेल्या वर्षभरात स्थायी समितीने सुमारे २५०० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांना मंजुरी देऊन विक्रम केला. यात भक्ती-शक्ती ग्रेड सेपरेटर व उड्डाणपुलाचे काम, भोसरी हॉस्पिटलच्या गॅस पाइपलाइनचे काम, कचरा वाहतुकीच्या ठेकेदारांना वारंवार मुदतवाढ देण्याचे कोट्यवधींचे विषय, कोट्यवधी खर्चाचे ऐनवेळचे विषय, बहिरवाडे क्रीडांगणाच्या सीमाभिंतीचे रिंग प्रकरण, रहाटणी येथील सीमाभिंतीचे रिंग प्रकरण, पंतप्रधान आवास योजनेतील रिंग प्रकरण, कचरा वाहतुकीची आठ वर्षांसाठी दिलेल्या कामातील रिंग प्रकरण, सुरक्षा कर्मचारी नेमण्याचे ठेके, ४२५ कोटींच्या रस्ते विकास कामातील रिंग प्रकरण आदी प्रकरणांसह एक वर्षातील निर्णयाबाबत भाजपाच्या खासदारांसह अनेकांनी गंभीर आक्षेप नोंदविले आहेत. या सर्व वादग्रस्त प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे, असे भापकर यांचे म्हणणे आहे.ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या महापालिका सभेतही आक्रमकपणे राष्ट्रवादीच्या काळातील भ्रष्टाचाराची प्रकरणे मांडताना विरोधकांवर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. विरोधी पक्षात असताना राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करून तुम्ही रान पेटवले होते. सत्तेत येऊन एक वर्ष झाले तरी त्यापैकी एक प्रकरणी तुम्ही धसास लावू शकला नाहीत. तुमच्या कुंडल्या आमच्या हातात आहेत, अशा धमक्या देत विरोधकांना वेठीस धरले. विरोधी पक्षात असताना ‘खा-खा, लुटून खा, खा-खा पुसून खा’ अशा घोषणा देत पालिका सभागृहात आणि बाहेरही आपण एकत्रित आंदोलने केली. नुकतीच पालिका मुख्यालयात केलेल्या आंदोलनात खा-खा, लुटून खा, खा-खा पुसून खा’ अशा घोषणा तुमच्या विरोधात देण्याची दुर्दैवी वेळ आणली. वर्षभरात स्वच्छ व पारदर्शक कारभार करून पालिकेचे कोट्यवधी रुपये वाचविल्याचा आव आपण आणत असला, तरी आपला कारभार जवळून पाहणाºयांना वस्तुस्थिती समजली आहे. या कारभाराची चौकशी झाली पाहिजे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड