शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड हरित होणे गरजेचे

By admin | Updated: July 4, 2017 03:41 IST

देशात स्मार्ट सिटी होत आहेत. केवळ स्मार्ट सिटी होऊन जमणार नाही. स्मार्ट शहराबरोबर हरित शहर करण्यासाठी पर्यावरणाचा स्मार्ट

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : देशात स्मार्ट सिटी होत आहेत. केवळ स्मार्ट सिटी होऊन जमणार नाही. स्मार्ट शहराबरोबर हरित शहर करण्यासाठी पर्यावरणाचा स्मार्ट विचार घेऊन हरित शहराचा मूलमंत्र शहरातील लोकांपर्यंत पोहचविला पाहिजे. वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. तीन दिवसांत राज्यात एक कोटी ६८ लाख वृक्षांची लागवड केली आहे, असे मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. महापालिकेच्या वतीने आयोजित वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात पिंपरी, मिलिटरी डेअरी फार्म येथून झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महापौर नितीन काळजे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, लेफ्टनंट कर्नल अविनाश शर्मा आदी उपस्थित होते.मुनगंटीवार म्हणाले, ‘‘पैशाने केवळ भौतिक सुख मिळते. मानवाला भौतिक सुखापेक्षा मनाच्या सुखाची गरज जास्त असून, वनराईतून मनाचे समाधान होते. शहराला वृक्षाची नावे दिली जातात. वनाचे संरक्षण होण्यासाठी ही नावे दिली जातात. शुद्ध हवा असेल, तर शुद्ध विचार आणि शुद्ध विचार असेल, तर शुद्ध आचारण होते. जगात प्रत्येक गोष्ट तयार करता येते. परंतु, प्राणवायू तयार करता येत नाही. प्राणवायूसाठी केवळ वडाचे झाड एकमेव यंत्र आहे. अनमोल प्राणवायू देणारे हे यंत्रच आपण तोडत आहोत. वृक्ष तोडणाऱ्या हातांपेक्षा वृक्ष लावणारे हात हजारपट करणे हेच या वृक्षलागवड मिशनचे लक्ष्य आहे.’’‘वृक्ष लागवडीसाठी सामाजिक संस्था लोकप्रतिनिधी, अपंग नागरिक सहभागी झाले आहेत. लोकांच्या मनात वृक्ष लावण्याच्या मानसिकतेचे बीजारोपण व्हावे, यासाठी हे मिशन आहे. वन विभागाच्या जमिनीवरील ८० टक्के वृक्ष जगले आहेत. इतर विभागांकडे वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी दिली आहे. नकारात्मक भूमिकेपेक्षा वृक्ष वाचविण्याची संख्या वाढवायची आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.मुंबई-पुणे महामार्गावरील वृक्षतोडीबाबत पत्रकारांनी विचारले असता मुनगंटीवार म्हणाले, ‘‘महामार्गाच्या कामासाठी वृक्ष तोडण्याची परवानगी दिली जाते. परंतु, ही परवानगी देताना वृक्ष लावण्याचे मिशनदेखील संबंधितांना दिले जाते. जिथे गरज आहे. तेथील वृक्ष तोडावे लागतात.’’ पिंपरीतील कार्यक्रमाची वेळ तीनची होती. कार्यक्रमस्थळी गर्दी जमावी या उद्देशाने एका शाळेचे विद्यार्थी दुपारी दोनपासूनच उपस्थित होते. मुख्य कार्यक्रम दीड तास उशिराने सुरू झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना ताटकळावे लागले. चार कोटी वृक्ष लागवड करणारमुनगंटीवार म्हणाले, ‘‘पर्यावरण टिकविण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. परंतु, दुसरे कोण करेल असा विचार न करता मी करेल, असा विचार घेऊन काम करणे गरजेचे आहे. महाराष्ट्राला हरित महाराष्ट्र घडविण्याचे उद्दिष्ट आहे. या वर्षी चार कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य आहे. तर पुढील वर्षी १३ कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य आहे. तसेच नागरिकांनी ग्रीन आर्मीचे सदस्य व्हावे. जिथे कुठे वृक्षाची अवैध तोड होत असेल, तर १९२६ या हॅलो फॉरेस्टवर कॉल करून पर्यावरणाचे सेनापती व्हावे.’’