शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड रेल्वे स्थानक : लोकसंख्या सातपट, पुलाची रुंदी तेवढीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 06:51 IST

पिंपरी-चिंचवड शहर व परिसराची लोकसंख्या सुमारे तीन लाख असताना शहरातून जाणा-या पाच रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल उभारण्यात आले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर व परिसराची लोकसंख्या सुमारे तीन लाख असताना शहरातून जाणाºया पाच रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल उभारण्यात आले. मात्र, सध्या हीच लोकसंख्या वीस लाखांच्या वर गेलेली असतानाही पादचारी पुलांची रुंदी तेवढीच आहे. शिवाय रेल्वे मार्गावरील पादचारी पुलांची संख्याही वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.पिंपरी-चिंचवड शहरात पाच रेल्वे स्थानके आहेत. यामध्ये पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, कासारवाडी, दापोडी यांचा समावेश आहे. या स्थानकांवर सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. शहराचा विस्तार वाढत असून, लोकसंख्याही वाढत आहे. पुण्यासह इतर ठिकाणी ये-जा करणाºयांमध्ये नोकरदार वर्गासह विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, प्रवास करण्यासाठी अनेकजणरेल्वेला प्राधान्य देत असल्यानेरेल्वे प्रवाशांच्या संख्येतही वाढ होत आहे. एकीकडे प्रवासी संख्या वाढत असताना दुसरीकडे अपुºया सुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक वर्षांपूर्वी तीन लाख लोकसंख्येचा विचार करून रेल्वेस्थानकांवरपादचारी पूल उभारण्यात आले. मात्र, सध्या लोकसंख्येत सात पटीने वाढ झाली असतानाही पुलांची रुंदी तितकीच आहे.रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांचे दुर्लक्षपादचारी पुलांवर सायंकाळी व सकाळच्या वेळी मोठी गर्दी होते. त्या वेळी तिथे रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी उपस्थित राहून अनुचित प्रकार घडणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र अनेकदा रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रवाशांनीही गर्दीच्या वेळी रांगेने पुढे सरकणे, ढकला ढकली न करणे, उशीर होत असला तरी घाई न करणे आदींची काळजी घेतली पाहिजे.पार्सल आॅफिसशेजारी दाटीवाटीपार्सल आॅफिस शेजारील पादचारी पुलाचा वापर प्रवाशांकडून खूप कमी प्रमाणात केला जातो. तिथे पार्सलचे सामान मोठ्या प्रमाणात पडलेले असते, त्याचबरोबर त्या ठिकाणी सामानांची ने-आण करणारे टेम्पो व गाड्या लागलेल्या असतात. त्यामुळे तेथून मोठ्या प्रवासी बॅगा घेऊन चालणे अत्यंत अवघड आहे. त्यामुळे प्रवाशांकडून मुख्य पादचारी पुलाचाच जास्त वापर केला जातो.लोकलची संख्या अपुरीपुणे ते लोणावळा या ६६ किलोमीटर अंतरावर लोकल धावते. दिवसातून ४२ फेºया होत असून, यामध्ये सुमारे ८० ते ९० हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र, प्रवासी संख्येच्या तुलनेत लोकलची संख्या अपुरी पडत आहे.नव्या पुलाची मागणीसकाळी व सायंकाळी लोकलला प्रचंड गर्दी असते. यासह एक्सप्रेस आल्यानंतरही देखील फलाटावर प्रवाशांची गर्दी होते. या वेळी जिन्यातून जात असताना प्रवाशांना अक्षरश: घाम फुटतो. त्यामुळे लोकलची संख्या वाढविण्यासह नव्याने पादचारी पुलांचीही उभारणी करणे आवश्यक बनले आहे.चिंचवड स्थानकावर भारशहरातील पाच स्थानकांपैकी चिंचवड रेल्वे स्थानक मोठे आहे. या ठिकाणी कोयना, भुसावळ, सिंहगड, इंदोर, नांदेड, ग्वाल्हेर या एक्सप्रेस थांबतात. त्यामुळे येथे रेल्वेतून चढ-उतार करणाºया प्रवाशांची संख्याही अधिक आहे.रेल्वे स्थानकांवर स्वयंचलित जिन्यांची आवश्यकता आहे. सध्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत रेल्व ेस्थानकावरील जिन्यांची रुंदी कमी असून, पुलांची संख्याही अपुरी आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.- गुलामअली भालदार,अध्यक्ष, चिंचवड प्रवासी संघ

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे