शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

पिंपरी-चिंचवड : बॅडमिंटनबाबत महापालिकेतर्फे आता नवे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 02:16 IST

महापालिकेच्या वतीने बॅडमिंटन हॉलबाबत नवीन सुधारित धोरण तयार केले आहे. शहरातील विविध ठिकाणच्या बॅडमिंटन हॉलमधील कोर्ट विविध संस्था, संघटना, खेळाडू यांना सराव, प्रशिक्षण आणि स्पर्धेसाठी देण्यात येणार आहे.

पिंपरी  - महापालिकेच्या वतीने बॅडमिंटन हॉलबाबत नवीन सुधारित धोरण तयार केले आहे. शहरातील विविध ठिकाणच्या बॅडमिंटन हॉलमधील कोर्ट विविध संस्था, संघटना, खेळाडू यांना सराव, प्रशिक्षण आणि स्पर्धेसाठी देण्यात येणार आहे. विधी समितीच्या पाक्षिक सभेत या प्रस्तावास मान्यता दिली.महापालिका हद्दीत १५ ठिकाणी बॅडमिंटन हॉल आहेत. या हॉलमध्ये २० कोर्ट आहेत. हे बॅडमिंटन कोर्ट सराव, प्रशिक्षण आणि स्पर्धेसाठी आरक्षणाद्वारे देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने सुधारित धोरण अवलंबण्यात येणार आहे. याबाबत क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभेत ठराव मंजूर केला. हॉलची वेळ पहाटे पाच ते रात्री दहा अशी असणार असून, सकाळी एक तासाचे दोन आणि सायंकाळी एक तासाचे दोन असे एकूण चार स्लॉट प्रशिक्षणासाठी राखून ठेवले जाणार आहेत. चार स्लॉटच्या वेळे व्यतिरिक्त प्रशिक्षणासाठी बॅडमिंटन हॉल उपलब्ध करून दिला जाणार नाही.शालेय विद्यार्थी, राज्य, राष्ट्रीय खेळाडू, क्रीडा संस्था, मंडळे, मार्गदर्शक यांना प्रशिक्षणासाठी सकाळी दोन व सायंकाळी दोन तास राखीव ठेवण्यात येणार आहेत. मात्र, त्यासाठी एक महिना अगोदर लेखी अर्ज करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी आरक्षण करून घेणारी क्रीडा संस्था, संघटना, मंडळे, क्लब, औद्योगिक संस्था नोंदणीकृत संस्था असणे आवश्यक आहे. त्यांनी किमान पंधरा दिवस अगोदर लेखी अर्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर ११ महिन्यांचे आरक्षण आॅनलाइनने दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी बॅडमिंटन हॉलचे शुल्क, प्रशिक्षण शुल्क, महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरावे लागेल.संबंधित संस्थेने दर तीन महिन्यांनी खेळाडूंना दिलेल्या प्रशिक्षणाबाबत प्रगती अहवाल सादर करणे आवश्यक आहे. आरक्षण काळात शासकीय किंवा महापौर चषक बॅडमिंटन स्पर्धा आयोजित केल्यास अशा वेळेस (वर्षातून किमान पंधरा दिवस) बॅडमिंटन हॉल विनामूल्य उपलब्ध करून देणे संबंधित संस्थेला बंधनकारक राहणार आहे. हे हॉल सरावासाठी देताना आॅनलाइन पद्धतीने आरक्षण दिले जाणार असून, दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्याचे बुकिंग केले जाणार आहे. मात्र, केलेले आरक्षण रद्द करण्यासाठी किमान सात दिवस अगोदर लेखी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा एकदा भरलेले आरक्षण शुल्क परत केले जाणार नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBadmintonBadminton