शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी- चिंचवड महापालिकेत ठेकेदारांची संगनमताने निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 04:22 IST

विरोधी पक्ष : चौकशी करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी

पिंपरी : महापालिका कार्यक्षेत्रातील घरोघरचा कचरा गोळा करणे व मोशी कचरा डेपो येथे वाहतूक विषयी निविदा प्रसिद्ध केली होती. या कामासाठी पूर्वी दोनच ठेकेदार आठ वर्षांच्या दीर्घ मुदतीसाठी नेमण्याचा निर्णय घेतला होता. वर्षभराने त्याच दोन्ही ठेकेदारांनी पदाधिकाऱ्यांशी संगनमत करून सोईच्या अटी-शर्तींचा समावेश करून दरामध्ये संगनमत करून निविदा भरल्या आहेत. संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

भाजपाची सत्ता आल्यानंतर कचºयाची निविदा मंजूर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला होता. राज्य सरकारकडे तक्रारी केल्या होत्या. न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर माहे एप्रिल २०१८मध्ये सदरच्या दोन्ही निविदा रद्द करून फेरनिविदा मागविल्या. आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी आठ ठेकेदार नेमण्याचा ठराव केला. मात्र, त्यात बदल करून दोनच विभागांत हे काम करावे, अशी दुरुस्ती स्थायी समितीने केली आहे.

म्हणजे पूर्वीच्या तुलनेने आठ वर्षांत सुमारे ८४ कोटी ५१ लाख रुपये वाचणार आहेत. हा सरळ सरळ भ्रष्टाचाराचा आदर्श नमुनाच म्हणावा लागेल. याच बरोबर दोन्ही ठेकेदारांनी एकाच दिवशी दर कमी करण्याचे पत्र देणे, दोन्ही ठेकेदारांनी एकसारखे म्हणजे प्रतिटन २३० रुपये कमी करणे हा केवळ योगायोग असू शकत नाही. दोन्ही ठेकेदारांनी परस्परसंमतीने, सामंजस्याने निविदा भरल्या व दरही कमी केले.कचरा निविदेचा कालावधी २०१६ला संपला असतानाही निविदा प्रक्रिया टाळून संबंधित अधिकारी व पदाधिकाºयांनी महापालिकेचे आर्थिक नुकसान केले आहे, असा आरोप दत्ता साने यांनी केला आहे.साडेसदोतीस कोटी वाचणार४भाजपाच्या पक्षांतर्गत कलहामुळे कचरा प्रश्न गंभीर व जटिल बनला आहे. कचºयाच्या कामामध्ये प्रतिटन २१० रुपये कमी झाले आहेत. त्यामुळे प्रतिवर्षी प्रतिटन २ कोटी ९५ लाख रुपये वाचले. आठ वर्षांत सुमारे ४७ कोटी ३३ लाख पूर्वीच्या दराच्या तुलनेने कमी झाले आहेत. त्याचबरोबर जाहिरात व प्रचारासाठी खर्च करण्यात येणाºया रकमेत कपात केल्यामुळे सुमारे ३७ कोटी ५७ लाख रुपये वाचणार आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड