रहाटणी : पालिकेच्या बांधकाम परवानगी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ड व क क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक २९ पिंपळे गुरव सृष्टी चौकाजवळील ६० फुटी रस्ता परिसरातील ३० पत्राशेडवर कारवाई करून सुमारे ३७ हजार १०० चौरस फूट अनधिकृत पत्राशडे भुईसपाट करण्यात आले. तर वाकड येथील प्रभाग क्रमांक २५ येथील १६ पत्राशेड व प्लॅस्टिक शेडवर कारवाई करून सुमारे १० हजार ९५३ चौरस फूट पत्राशेड पाडण्यात आले. एकाच दिवशी वाकड व पिंपळे गुरव परिसरात ३६ पत्राशेडवर कारवाई करून सुमारे ४८ हजार ५३ चौरस फूट अनधिकृत पत्राशेड जमिनोदोस्त केली.
पिंपळे गुरव व वाकडमध्ये ३६ अनधिकृत पत्राशेडवर पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 18:17 IST
प्रभाग क्रमांक २९ पिंपळे गुरव सृष्टी चौकाजवळील ६० फुटी रस्ता परिसरातील ३० पत्राशेडवर कारवाई करून सुमारे ३७ हजार १०० चौरस फूट अनधिकृत पत्राशडे भुईसपाट करण्यात आले.
पिंपळे गुरव व वाकडमध्ये ३६ अनधिकृत पत्राशेडवर पिंपरी चिंचवड महापालिकेची कारवाई
ठळक मुद्देमागील काही दिवसांपासून कारवाई सुरू असल्याने नागरिक भयभीतअनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा सज्ज