शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाहिनीतून पेट्रोलची चोरी

By admin | Updated: March 19, 2017 03:58 IST

हिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशनच्या मुंबई ते सोलापुर डिझेल-पेट्रोल वाहिनीस छिद्र पाडून अज्ञात चोरट्याने साडेसहा लाख रुपये किंमतीच्या दहा हजार लिटर डिझेल व पेट्रोलची चोरी

देहूरोड : हिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशनच्या मुंबई ते सोलापुर डिझेल-पेट्रोल वाहिनीस छिद्र पाडून अज्ञात चोरट्याने साडेसहा लाख रुपये किंमतीच्या दहा हजार लिटर डिझेल व पेट्रोलची चोरी केल्याची घटना उघडकीस आली. हा प्रकार तळवडे गावाजवळ घडला. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉपोर्रेशनच्या वतीने पीयूष उमेश्चंद्र वर्मा ( वय ४६ . रा मगरपट्टा , हडपसर, पुणे) यांनी याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशनची मुंबई ते सोलापूर अशी भूमिगत चौदा इंची वाहिनी अंदाजे चार फूट असून त्यातून पेट्रोल, डिझेल व केरोसिनची वाहतूक होते. या इंधनाची चोरी होत असल्याचे कॉपोर्रेशनच्या निदर्शनास आल्यानंतर व्यवस्थापनाने रात्र गस्तीसाठी पथक नियुक्त केले होते. तळेगाव नियंत्रण कक्षामध्ये वाहिनीतून गळती किंवा चोरी बाबत संबंधित यंत्रणेवर इंडिकेटरद्वारे समजते. तसेच पीआय डिएस यंत्रणेत संबंधित वाहिनीवर कोणी छिद्र (खड्डा) घेत असल्याचे इंडिकेटर दिसून आले. त्यानंतर दहा मार्चला पंपिंग चालू असताना तळेगाव येथून पास होणारे इंधन लोणी येथे पोहोचत नसल्याचा फरक लक्षात आला. यासह गळतीचा अलार्मही वाजला.(वार्ताहर) अशी आली चोरी उघडकीस१४ मार्चला कंपनीच्या हैद्राबाद विभागाने लाईनवर कि मी क्रमांक नं १२६.६ ते १३० किमी दरम्यान लिकेज किंवा चोरीचा पॉइंट असल्याची माहिती दिली. १७ मार्चला कॉपोर्रेशनचे अधिकारी हिमांशू जंतबल यांच्या पथकाने तळवडे गावच्या हद्दीत जेसीबीने खोदाई केली असता मुख्य पाईपवर दुसरा एक छोटा एल आकाराचा लोखंडी पाईप जोडल्याचे आढळून आले.