शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पादचारी पुलाचे कोटींचे ‘उड्डाण’

By admin | Updated: March 5, 2016 01:01 IST

उड्डाणपुलांच्या वाढीव खर्चाचे ‘उड्डाण’ घेण्यावरून नेहमीच चर्चेत असलेल्या महापालिकेने भोसरीतील शीतलबाग पादचारी पुलाबाबत तर ‘रेकॉर्ड ब्रेक’ कामगिरी केली आहे.

पिंपरी : उड्डाणपुलांच्या वाढीव खर्चाचे ‘उड्डाण’ घेण्यावरून नेहमीच चर्चेत असलेल्या महापालिकेने भोसरीतील शीतलबाग पादचारी पुलाबाबत तर ‘रेकॉर्ड ब्रेक’ कामगिरी केली आहे. ७१ लाखांचा पूल तब्बल साडेसात कोटींवर पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पुणे-नाशिक महामार्गावर भोसरीतील शीतलबाग येथे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पादचारी पूल उभारण्यात येत आहे. मात्र, या पुलाचा खर्च दिवसेंदिवस वाढतच आहे. अवघ्या साडेतीन वर्षांत हा पूल साडेसात कोटींवर पोहोचला आहे. बांधकाम साहित्यात वाढ झाल्याच्या नावाखाली विविध कामांमध्ये वाढीव खर्चाची ‘उडी’ घेणाऱ्या महापालिकेचा वाढीव खर्चाचा सपाटा सुरू आहे. महापालिकेची बहुतेक कामे ही विविध कारणांनी खर्चाच्या बाबतीत फुगत जात आहेत. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर भार पडत आहे. भोसरीतील पीएमटी चौकात वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शीतलबाग ते धावडेवस्तीदरम्यान एक किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारला. यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न सुटला. मात्र, शीतलबाग येथे उड्डाणपूल संपल्यानंतर तीव्र उतार आहे. उतार आणि उड्डाणपुलावरून येणारी भरधाव वाहने यामुळे छोटे-मोठे अपघात घडतात. उड्डाणपुलामुळे रस्ता प्रचंड रुंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडताना कसरत करावी लागायची. ही समस्या लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी महापालिका प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडे पादचारी पूल उभारण्याबाबत मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने शीतलबाग येथे पादचारी पूल उभारण्याचा निर्णय आॅगस्ट २०१२मध्ये घेतला. या पुलासाठी आॅनलाइन निविदा मागविण्यात आल्या होत्या. या कामासाठी ७१ लाख ५ हजार इतका खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. केवळ पादचारी पुलासाठी पाऊण कोटीच्या खर्चाबाबत नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात होते. एका वर्षाच्या आत पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार होते. मात्र, पुलाचे काम रखडले. दरम्यान, भोसरीतील स्थानिक नगरसेवक स्थायी समितीचे सभापती झाल्यानंतर दोन वर्षांपासून रखडलेले पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा तयारी सुरू झाली. आॅगस्ट २०१४मध्ये झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रश्नावरून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले होते. त्यानंतर या कामासाठी पुन्हा निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार तब्बल पाच कोटी ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. म्हणजेच आॅगस्ट २०१२मध्ये या पुलासाठी अपेक्षित धरण्यात आलेला ७१ लाखांचा खर्च आॅगस्ट २०१४मध्ये ५ कोटी ३५ लाखांवर पोहोचला. दोन वर्षांत या पुलाचा खर्च साडेसात पटीने वाढला. (प्रतिनिधी)