शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या विम्याचा महापालिकेला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 01:23 IST

तरतूद नसल्याने योजना बारगळली : मुलांच्या जिवाची प्रशासनाला नाही पर्वा

पिंपरी : महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विमा संरक्षण देण्यात आले होते. ही योजना फक्त एक वर्षापुरती राबवून त्यानंतर बंद करण्यात आली. त्यामुळे शहरातील पालकांमधून नाराजीचा सूर येत आहे.

महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा खासगी कंपनीमार्फत विमा काढण्यात आला होता. शाळेत येताना व शाळेतून घरी जाताना तसेच इतरवेळेसही अपघात झाल्यास विद्यार्थ्याच्या औषधोपचारासाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला होता.त्यामध्ये ३७ हजार ६६४ विद्यार्थ्यांना विमा संरक्षण देण्यात आले होते. प्रत्येक विद्यार्थ्यामागे ४० रुपये घेण्यात आले होते. त्यानुसार १५ लाख पंधरा हजार रुपयांची विमा पॉलिसी काढण्यात आली होती. या शैक्षणिक वर्षामध्ये एकाच विद्यार्थ्याला या विम्याचा फायदा मिळाला असला तरी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही योजना लाभकारक होती. मात्र विमा योजना बंद केल्यामुळे पालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच महापालिका प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या जिवाची पर्वा नाही का असा सवाल पालक करीत आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांचा आरोग्य विमा उतरावा, त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करावी, अशी मागणी महापौर राहुल जाधव यांनी केली आहे. याबाबत आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिकेच्या शाळेत सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थी अचानक आजारी पडल्यास, शस्त्रक्रिया करावी लागल्यास संबंधित कुटुंबास आर्थिक परिस्थितीमुळे उपचाराचा खर्च करणे शक्य होत नाही. त्या वेळी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा शालेय विद्यार्थ्यांचा आरोग्य विमा उतरविणे आवश्यक आहे. तरी महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांचा आरोग्य विमा उतरविण्यात यावा. यासाठी अंदाजपत्रकात आवश्यक तरतूद करावी, असे पत्रात म्हटले आहे.अपघात झाल्यास पालकांना होतो भुर्दंडया विमा योजनेमुळे विद्यार्थ्याचा अपघात झाला तर त्याच्यावर औषधोपचार करण्यासाठी पालकांना आर्थिक हातभार मिळत होता. राज्य शासनाने पालकांना आर्थिक हातभार लागावा यासाठी २०१३ मध्ये राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे. मात्र यासाठी अनेक निकष असल्याने महापालिकेने काढलेल्या पॉलिसीला पालकांची पसंती मिळत होती. विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहेत. भविष्यामध्ये हेच विद्यार्थी आपल्या शहराचे राष्ट्रीय व जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करणार आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी काढण्यात येणाºया विमा पॉलिसी फक्त एक वर्षापुरत्या राबवून बंद केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी व पालकांच्या आर्थिक हातभारासाठी काढण्यात आलेल्या विमा पॉलिसीचा महापालिका प्रशासनाला विसर पडला आहे का, असा सवाल पालक करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड