शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

PCMC Election| प्रभाग रचनेचा खेळखंडोबा, ११ जणांची संधी हुकणार

By विश्वास मोरे | Updated: August 3, 2022 21:48 IST

महापालिका निवडणूक फेब्रुवारी २०२३ ला होण्याची शक्यता....

पिंपरी : राज्यातील सत्तांतराचे परिणाम महापालिका निवडणूकींवर होत असून महाविकास आघाडीने तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडत काढली. आता  भाजपा आणि शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाचे सरकार राज्यात येताच २०१७ च्या नुसार निवडणूक प्रक्रिया राबवावी, याबाबत मंत्रीमंत्रडळ बैठकीत बुधवारी निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक फेब्रुवारी २०२३ ला होण्याची शक्यता वर्तविली जात असून प्रभाग रचनेच्या खेळखंडोबामुळे ११ जणांची संधी हुकणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची मुदत १४ मार्च २०२२ मध्ये संपुष्टात आल्यानंतर महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर २०२१ पासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. मात्र, अद्यापही निवडणूक होऊ शकली नाही. प्रभाग रचना  कितीचा आणि ओबीसी आरक्षण यामुळे गेले वर्षेभर निवडणूक प्रक्रिया रखडली आहे. त्यानंतर सर्वोच्य न्यायालयाने ओबीसी वगळून निवडणूका घेण्याचे आदेश सुरूवातीला दिले. त्यानंतर पहिल्यांदा एससी आणि एसटी, सर्वसाधारण गटाची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानंतर  राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे गटाचे सरकार आल्यानंतर दिल्यानंतर ओबीसीसह आरक्षण सोडत काढण्याचे आदेश आले. त्यानंतर सर्वसाधारण गटातील ११४ जागांपैकी आरक्षण सोडत काढण्यात आली.  सदस्य राहणार १२८महापालिकेची २०१७ ची निवडणूक ही चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार १२८ सदस्य संख्येनुसार झाली होती. त्यामुळे डिसेंबर २०२१ मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने सुरूवातीला तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला. त्यानंतर वाढत्या लोकसंख्येनुसार वॉर्डांची संख्या वाढविली.  त्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. भाजप आणि शिंदे गट आघाडीचे सरकार आल्यानंतर आज राज्य सरकारने २०१७ च्या सदस्यसंख्येनुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १२८ सदस्य संख्येनुसार निवडणूक  करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. मात्र, निवडणूक चार सदस्यीय की तीन सदस्यीय याबाबत संदिग्धता कायम आहे.इच्छुकांच्या आशेवर पाणीमहाविकास आघाडी सरकारने लोकसंख्येच्या सूत्रानुसार वॉर्ड करण्याचा निर्णय घेतल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेत ११ सदस्य आणि प्रभाग वाढले होते. मात्र, आता भाजपा सरकारने नवीन निर्णय घेतल्याने १३९ ऐवजी १२८ प्रभागच असणार आहेत. त्यामुळे प्रभाग रचना आणि आरक्षणानंतर महापालिका  महापालिका निवडणूकीचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. त्यामुळे शहरातील अकरा सदस्यांची संधी हुकणार आहे.

महापालिका निवडणूकीबाबत अद्याप राज्य शासन किंवा निवडणूक आयोगाकडून कोणताही आदेश आलेला नाही. याबाबत कोणता आदेश आल्यास आयोगाच्या सूचनेनुसार प्रक्रिया राबविली जाईल.-बाळासाहेब खांडेकर, सहायक आयुक्त

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका