शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पारगावला पोलिसांनी दोन अल्पवयीन विवाह रोखले

By admin | Updated: March 12, 2016 01:28 IST

पारगाव (ता. दौंड) येथे होणारे दोन अल्पवयीन चिमुकल्या जोडप्यांचे विवाह यवत पोलीस व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे थांबवण्यात आले.

केडगाव : पारगाव (ता. दौंड) येथे होणारे दोन अल्पवयीन चिमुकल्या जोडप्यांचे विवाह यवत पोलीस व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे थांबवण्यात आले. पारगाव परिसरात देलवडी -पारगाव रस्त्याच्या कडेला देऊळवाले लोकवस्तीत सदरचे विवाह आज शुक्रवारी (दि. ११) दुपारी दोन वाजता होते. जोडपी अल्पवयीन असल्याची खबर यवत पोलिसांना लागली. प्रसंगावधान राखून विवाहापूर्वी पोलिसांचे पथक पारगावला विवाहस्थळी दाखल झाले. या वेळी ५00 वऱ्हाडी उपस्थित होते. लक्ष्मण गायकवाड व राहुल गायकवाड यांचा विवाह अनुक्रमे राणी जाधव व संगीता निंबाळकर यांच्याशी होणार होता. सर्व वधू व वर बारा ते अठरा वयोगटातले होते. पोलिसांनी नवरदेवांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलीस हवालदार शितोळे, नगरे, हजारे व कदम यांनी सहभाग घेतला. याबाबत देऊळवाले समाजाचे प्रमुख सुरेश निंबाळकर म्हणाले, की सदरचा कार्यक्रम विवाह नसून साखरपुडा होता. वधू-वर वयाची अट पूर्ण केल्यावरच संबंधित विवाह भविष्यात केला जाईल. अल्पवयीन विवाह ही समाजपरंपरा असून, यापूर्वी अनेकदा असे प्रकार घडले आहेत. परंतु प्रथमच पोलिसांसमोर हा प्रकार उघडकीस आल्याचे एका जाणकार व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. (वार्ताहर)