शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तालयात घोडेबाजार रंगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 04:19 IST

बहुप्रतीक्षित पोलीस निरीक्षकांच्या बढत्या शनिवारी गृह विभागाने जारी केल्यानंतर पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील घडामोडींना भलताच वेग आला आहे.

पुणे : बहुप्रतीक्षित पोलीस निरीक्षकांच्या बढत्या शनिवारी गृह विभागाने जारी केल्यानंतर पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील घडामोडींना भलताच वेग आला आहे. काही वरिष्ठ निरीक्षकांची पदोन्नतीने बदली झाल्याने आता रिकाम्या पोलीस ठाण्यांच्या प्रभारी पदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी अनेकांनी फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे. बदल्या जाहीर झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आतच ‘क्रिम पोस्टींग’ समजल्या जाणाºया पोलीस ठाण्यांसाठी काही निरीक्षकांमध्ये चढाओढ लागली आहे.गेल्या महिन्याभरामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये जवळपास ९० पेक्षा अधिक घरफोड्या झाल्या आहेत. चोरटे राजरोसपणे कोट्यवधींचा ऐवज लंपास करीत आहेत. शहरामध्ये वाटमाºयांच्या घटना वाढल्या आहेत. मोबाईल चोरी तर नित्याचीच झाली आहे. यासोबतच दोन गटातील हाणामारीचे प्रकारही वाढलेले आहेत.नुकतेच समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये घुसून टोळक्याने केलेल्या तोडफोडीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. अशा एक ना अनेक घटना घडत असताना त्याकडे मात्र पोलीस अधिकाºयांचे लक्ष नाही. आपल्याला क्रिम पोस्टींग मिळावे यासाठी मात्र अनेकांची धडपड सुरु आहे.