शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

माननीयांकडून नागरी सुविधांचा पंचनामा; आरोग्य समस्येचा बोजवारा उडाल्याची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 02:39 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पावरील चर्चेत भाजपासह राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि अपक्ष नगरसेवकांनी नागरी सुविधांचा पंचनामा केला. सत्ताधारी भाजपाच्या काही सदस्यांनी अर्थसंकल्पांचे गोडवे गायले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पावरील चर्चेत भाजपासह राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि अपक्ष नगरसेवकांनी नागरी सुविधांचा पंचनामा केला. सत्ताधारी भाजपाच्या काही सदस्यांनी अर्थसंकल्पांचे गोडवे गायले. पाणीटंचाई, आरोग्य प्रश्नाचा वाजलेला बोजवारा, पाणीपट्टी आणि मिळकतकर पाणीपुरवठा लाभकर वाढ यावर प्रकाश टाकला. आर्थिक शिस्तीबरोबरच प्रशासकीय शिस्त हवी. मेट्रोबरोबरच नागरिकांना मूलभूत सुविधांचे सक्षमीकरण करावे, अशी मागणीही केली. आजच्या दिवशी सुुमारे साडेसात तास चर्चा झाली.आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पालिकेचा सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा मूळ ३५०० कोटी, तर जेएनएनयूआरएमसह ५२३५ कोटींचा अर्थसंकल्प महापालिका स्थायी समितीला सादर केला. त्यानंतर स्थायी समिती सदस्यांनी अर्थसंकल्पावर चर्चा करत उपसूचनांद्वारे २७ कोटी रुपयांची वाढ केली. तसेच, एकाच दिवशी अध्यक्षा सीमा सावळे यांनी अर्थसंकल्पाला मंजुरी देण्याचा विक्रम केला होता. यंदाचा अर्थसंकल्प उपसूचनेमुळे ५२६२ कोटी ३० लाखांवर पोहोचला होता.त्यानंतर अर्थसंकल्पावरील विशेष सभेचे आयोजन केले होते. मात्र, दोनदा ही सभा तहकूब केली होती. गेल्या वर्षी दहा मिनिटांतच अर्थसकंल्प मंजूर केला होता. त्यामुळे भाजपा टीकेची धनी झाली होती. त्यामुळे यावर्षी चर्चा होणार किंवा नाही, याबाबत उत्सुकता होती. आज दोन टप्प्यात ही सभा झाली. सकाळी अकरा ते दुपारी सव्वा एक आणि सायंकाळी पावणेपाच ते रात्री उशिरापर्यंत सभा सुरू होती. पहिल्या टप्प्यातील चर्चेत महापौर नितीन काळजे यांनी सर्वांना बोलण्याची संधी दिली जाईल, असे सांगितले.आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मिळकतींचे सर्वेक्षण करून कर उत्पन्न वाढविता येईल, स्मशानभूमीत सोलर यंत्रणा बसवायला हवी. स्थापत्यावरील तरतूद पूर्णपणे अंमलबजावणी केली जावी, अशी सूचना नीता पाडाळे यांनी केली. ‘मच्छरांचा त्रास वाढला आहे, जलपर्णी काढण्याची मागणी भाजपाचे हर्षल ढोरे यांनी केली. ‘लोकसंख्येच्या वाढीनुसार वाहनेही वाढली आहेत. त्यामुळे पार्किंगचे नियोजन करायला हवे. तालेरात रक्तपेढी सुरू करावी. चिंचवडला आर्ट गॅलरी उभारावी, अशी मागणी शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे यांनी केली. ‘‘समाविष्ट गावांतील आरक्षणांचा विकास करावा, अशी मागणी स्वीनल म्हेत्रे यांनी केली. अर्थसंकल्पाचे कौतुक सत्ताधाऱ्यांनी केल्यानंतर माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांनी टीका केली. डायबेटीस होईल, एवढे गोडवे गायले जात आहेत. मात्र, अर्थसंकल्पात काही गोष्टींची कमतरता आहे, ही गोष्ट मान्य करायला हवी. प्रभागांना दिलेला निधी कमी आहे. मग नियोजित विकासकामे कशी होणार?’’लग्नाआधी बारशाचे काम‘अपंगाना पेन्शन देण्यापेक्षा त्यांना स्वावलंबी बनवायला हवे. पेन्शन पुरेशी नाही. मेट्रोचा मोठा गाजावाजा केला. मात्र, ही मेट्रो पिंपरीपर्यंतच आहे. मेट्रोचे प्रत्यक्षात गाजरच शहरवासीयांच्या हाती पडले. ती निगडीपर्यंत नेण्याची गरज आहे. भामा आसखेडचे पैसे न भरल्याने परवनगीचीही मुदत संपली आहे. पवना धरणातून पाणी आणण्याच्या योजनेत शेतकºयांवर गोळीबार झाला. त्यामुळे खर्च वाया गेला. लग्नाच्या आधी बारसे करण्याचे काम केले जात आहे. पाण्याचा प्रश्न सोडविला नाही तर भविष्यात पाण्यावरून दगडफेक करायला नागरिक मागे पुढे पाहणार नाहीत. नाट्यगृहांचे पेव वाढत आहे. सद्याच्या नाट्यगृहात लावण्या आणि तमाशेच होत आहेत. पुढील पिढीला काय देणार आहोत, असा सवाल शिवसेनेच्या नगरसेविका मीनल यादव यांनी उपस्थित केला.निगडीपर्यंत मेट्रोची आवश्यकतासुरुवातीला माई ढोरे यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींवर प्रकाश टाकत, अर्थसंकल्पाचे कौतुक केले. अपंग कल्याणकारी योजना, महिला बाल कल्याणच्या योजनांचे कौतुक केले. ‘शास्तीकराबाबत विचार व्हावा, यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रियंका बारसे यांनी केली. बाबू नायर म्हणाले, ‘‘अर्थसंकल्पाची अंमलबजावणी तातडीने करावी. डिसेंबरपर्यंत कामांचे आदेश मिळतील याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. पाणीपुरवठ्यातील गळती रोखावी. क्रीडा विभागांचे सक्षमीकरण करावे, निगडीपर्यंत मेट्रो न्यावी.’’ त्यानंतर ‘आरोग्याचा प्रश्न जटिल झाला आहे. गाड्या कमी आहेत, खरेदी करण्याची गरज असल्याचे माया बारणे म्हणाल्या.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड