शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अधिकमासामुळे लांबणार पालखी सोहळा, जुलैच्या पहिल्या आठवड्यात वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 01:07 IST

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३३ व्या पालखी सोहळ्याच्या प्राथमिक तयारीला श्री संत तुकाराममहाराज संस्थानाच्या वतीने सुरुवात झाली.

देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३३ व्या पालखी सोहळ्याच्या प्राथमिक तयारीला श्री संत तुकाराममहाराज संस्थानाच्या वतीने सुरुवात झाली. हा पालखीसोहळा श्रीक्षेत्र देहूगाव येथून ज्येष्ठ कृष्ण सप्तमी गुरुवार, ५ जुलै रोजी प्रथेप्रमाणे दुपारी दोनच्या सुमारास श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. हा पालखी सोहळा देहूतून निघाल्यावर ६ जुलैला पालखी उद्योगनगरीत दाखल होईल, तर पुण्यात ७ जुलैला पोचणार आहे, अशी माहिती श्री संत तुकाराममहाराज संस्थानाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पालखी सोहळ्याचा कार्यक्रम फडकरी, दिंडीचालक यांच्या सभेत जाहीर केला आहे.पालखी सोहळ्याचे ५ जुलैला प्रस्थान व पहिला मुक्काम श्रीक्षेत्र देहूगाव इनामदार वाड्यात होईल. ६ जुलैला आकुर्डी विठ्ठल मंदिर, ७ आणि ८ जुलैला श्री निवडुंगा श्री विठ्ठलमंदिर पुणे, ९ जुलैला लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिर, १० जुलै यवत, ११ जुलै वरवंड, १२ जुलै उंडवडी गवळ्याची, १३ जुलै बारामती शारदा विद्यालय, १४ जुलै सणसर, १५ जुलै (बेलवडी येथे गोल रिंगण) निमगाव केतकी, १६ जुलै (इंदापूर येथे गोल रिंगण) इंदापूर, १७ जुलै सराटी, १८ जुलै (माने विद्यालय येथे गोल रिंगण) अकलुज, १९ जुलै (माळीनगर येथे उभे रिंगण) बोरगाव, २० जुलै (तोंडले बोंडले येथे धावा) पिराची कुरोली, २१ जुलै (बाजीराव विहीर येथे उभे रिंगण) वाखरी तळावर मुक्काम करणार असून, पालखी २२ जुलै रोजी दुपारी एकनंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून, रात्री पंढरपूर शहरात श्री संत तुकाराममहाराज मंदिरात मुक्कामाला पोहोचणार आहे, तर २३ जुलैला नगरप्रदक्षिणा करून पालखी २७ जुलैपर्यंत येथेमुक्कामी राहील.>परंपरेनुसार यंदा पालखीचा पुणे येथील नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठ्ठल मंदिरात दोन दिवस मुक्काम सोडला, तर प्रत्येक ठिकाणी एकच मुक्काम होणार आहे. या पालखी सोहळ्याच्या दरम्यान प्रथेप्रमाणे बेलवडी येथे पहिले गोल रिंगण होणार असून, इंदापूर, सराटी येथील माने विद्यालयाजवळ व माळीनगर येथे उभे रिंगण, तोंडले बोंडले येथे धावा, तर बाजीराव विहिरीजवळ आणि वाखरीवर भाविकांना उभे रिंगण पाहायला मिळेल.

टॅग्स :sant tukaramसंत तुकाराम