शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवडमध्ये मुलाच्या अपहरणाचा फसला डाव  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 14:47 IST

बोपखेल येथील गणेश नगरमध्ये राहणा-या राजाराम ढेरे यांच्या तीन वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. घरात मुलाची आजी असल्याने अपहरणकर्त्यांचा डाव फसला.

पिंपरी चिंचवड, दि. 31 - बोपखेल येथील गणेश नगरमध्ये राहणा-या राजाराम ढेरे यांच्या तीन वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. घरात मुलाची आजी असल्याने अपहरणकर्त्यांचा डाव फसला. याप्रकरणी ढेरे कुटुंबीयांनी दिघी पोलिसांकडे धाव घेतली मात्र पोलिसांनी प्रकरणाकडे गांभीर्याने न पाहता पुन्हा असा प्रयत्न झाल्यास 100 क्रमांकावर संपर्क साधा,  असा सल्ला दिला. 

अपहरणाच्या उद्देशाने आलेली अज्ञात व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पुन्हा त्या व्यक्तीचा बोपखेलमध्ये वावर दिसून आला. त्यामुळे ढोरे कुटुंबीय भयभीत झाले आहे.  बोपखेल, गणेश नगर भागातील कॉलनी क्रमांक सातमधील ही घटना आहे. आई वडील सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता एका अनोळखी व्यक्तीनं ढोरे यांच्या घरात प्रवेश केला. 

घरात असलेल्या मुलाच्या आजीला म्हणाला, मुलाच्या वडिलांनी त्याला घेऊन येण्यास सांगितले आहे. मात्र आजीने मुलाला घेऊन जाण्यास नकार दिला असता त्या अज्ञातानं मुलाला हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आजी भारती कु-हाडे यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी अपहरणकर्त्यानं धूम ठोकली. याबाबत परिसरात चौकशी केली असता देवकर डेअरी येथील सीसीटीव्हीमध्ये तो व्यक्ती कैद झाला. मात्र तोंड झाकलेले असल्याने त्याला ओळखणे कठीण झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज घेऊन मुलाचे वडील राजाराम ढेरे दिघी पोलीस चौकीत गेले मात्र तेथे त्यांची तक्रार नोंदवून घेतली गेली नाही फक्त गस्त घालणारे पोलीस ढेरे यांच्या घरी पाठवून विचारपूस करण्यात आली. पुन्हा काही झाले तर 100 नंबरवर संपर्क साधा, असे ढेरेंना सांगण्यात आले. परंतु अशीच घटना 4 दिवसांपूर्वी राम नगर भागात घडली होती त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.