शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भात पेरणीस झाली सुरुवात

By admin | Updated: June 2, 2017 02:15 IST

पवन मावळ परिसरात नदीच्या पाण्यावरील भात पेरणी करण्यास काही शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. पवना धरण परिसरातील

लोकमत न्यूज नेटवर्ककाले : पवन मावळ परिसरात नदीच्या पाण्यावरील भात पेरणी करण्यास काही शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. पवना धरण परिसरातील ज्या ठिकाणी शेतीसाठी सिंचन सुविधा आहे त्या ठिकाणी भाताची पेरणी शेतकरी करत आहे. मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला असून, लवकरच पश्चिम महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता असल्याने भात पेरणीच्या कामासाठी शेतकरी लगबग करू लागले आहेत.पवन मावळात काही ठिकाणी धुळवाफेवरील पेरणीची कामे एक अवकाळी पाऊस झाल्यावर करणार असल्याने शेतकरी एका पावसाची वाट पाहात आहेत. मावळ तालुका भातासाठी प्रसिद्ध आहे. येथे प्रामुख्याने इंद्रायणी या वाणाचे उत्पादन घेतले जाते. अलीकडे फुले समृद्धी हा वाणही भातउत्पादकांना आकर्षित करु लागला आहे. मात्र, आंबेमोहोरसारखा वाण आता मावळातून हद्दपार होतो की काय अशी स्थिती आहे. तुलनेने कमी उत्पादन मिळत असल्यामुळे या वाणाचे फार थोडे शेतकरी उत्पादन घेत आहेत. शासनाचा कृषी विभागा खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. शेतकऱ्यांना विविध उपक्रम, योजनाद्वारे मार्गदर्शन, मदत केली जात आहे. विशेषत: भातपीकाबाबत अधिक पुढाकार घेतला जात आहे. एसआरटी, चतुसुत्रीपद्धतीने लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले जात आहे. त्या साठी कार्यशाळा, प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. भात बियाणांबाबतही मार्गदर्शन करण्यात येत आहे. बीजप्रक्रियापासून पेरणी, लागवडीपर्यंतचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाला. हवामानानेही चांगली साथ दिली. त्यामुळे भाताचे उत्पादन चांगले झाले होते. या वर्षीही मान्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याचा आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भातलागवडीस विलंब होऊ नये म्हणून काही शेतकरी त्यामुळेच भातपेरणीची लगबग करीत असल्याचे पवन मावळात दिसत आहे.