शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कामगारानेच केला मालकाचा खून, सांगवीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 04:54 IST

सांगवी येथील समर्थनगर येथे सोमवारी सकाळी दहाला एका ४० वर्षीय कैलास राणोजी तौर याचा मृतदेह घरातील स्वच्छतागृहात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला होता. हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

पिंपरी : सांगवी येथील समर्थनगर येथे सोमवारी सकाळी दहाला एका ४० वर्षीय कैलास राणोजी तौर याचा मृतदेह घरातील स्वच्छतागृहात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला होता. हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.कैलास तौर या फॅब्रिकेशन व्यावसायिकाने त्याच्या वर्क शॉपमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या पत्नीवर अतिप्रसंग केल्याने कामगाराने चिडून जाऊन मारहाण केली. भिंतीवर त्याचे डोके आपटले. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. शिरीष वर्मा (वय ३३, रा. पिंपळे निलख) या आरोपीला खूनप्रकरणी अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फॅब्रिकेशन व्यवसाय असलेल्या तौर याने पत्नी, मुले यांना गावी सोडले. मूळ गाव गेवराई, जिल्हा बीड येथे पत्नी व मुलांना सोडून आल्यानंतर तौर सांगवी समर्थनगर येथील घरी एकटेच होते. त्यांनी रविवारी रात्री त्यांच्याबरोबर काम करणारा कामगार शिरीष वर्मा याला कुटुंबासह जेवणासाठी घरी बोलावले. रात्री तौर यांच्या घरी पार्टी झाली. मद्यप्राशन, जेवण केल्यानंतर सर्वांनी तौर यांच्याच घरी झोपण्याचे ठरविले. वर्मा पत्नीसह तौर यांच्या घरी मुक्कामी थांबले. रात्री तौर यांनी वर्मा यांच्या पत्नीवर अतिप्रसंग केला. पत्नीचा आरडाओरडा ऐकू आल्याने वर्मा यांना जाग आली. रागाच्या भरात वर्मा याने तौर यांना मारहाण केली. तसेच त्यांचे डोके भिंतीवर आदळले. जबरी मार लागल्याने तौर तेथेच कोसळले. तौर यास रक्ताच्या थारोळ्यात आहे तसेच ठेवून वर्मा पत्नीला घेऊन रात्रीच तौर याच्या घरातून बाहेर पडले.सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ननावरे, अलका सगर, फौजदार मधुमती शिंदे, शिरीष राऊत, शंकर जाधव, सुरेश खांडेकर, रोहिदास बोहले, नितीन दांगडे,कैलास केंगळे, दीपक भिसे यांच्या पथकाने आरोपीला २४ तासांच्या आत जेरबंद केले.- सकाळी नेहमीप्रमाणे वर्कशॉपवर एक कामगार आला. वर्क शॉप खुले नसल्याने तो मालक तौर राहत असलेल्या ठिकाणी त्यांच्या घरी गेला. त्या वेळी ही बाब त्याच्या निदर्शनास आली. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी वर्मा, तसेच त्याच्या पत्नीकडे सखोल चौकशी केली, त्या वेळी वर्मा याने खुनाचीकबुली दिली.

टॅग्स :Murderखूनpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड