शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयाकडे थकबाकी

By admin | Updated: March 27, 2017 02:47 IST

सांगवी येथील जिल्हा रुग्णालयाकडे महापालिकेच्या मालमत्ता कराची सुमारे १ कोटी ४७ लाख रुपयांची रक्कम थकीत

पिंपरी : सांगवी येथील जिल्हा रुग्णालयाकडे महापालिकेच्या मालमत्ता कराची सुमारे १ कोटी ४७ लाख रुपयांची रक्कम थकीत असल्याने पालिकेने रुग्णालयाला नोटीस दिली आहे. शुक्रवारी केलेल्या कारवाईत रुग्णालयाने १३ लाख रुपये जमा केले आहेत. उर्वरित रक्कम शासनाकडून मिळाल्यानंतर त्वरित देणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. मार्च अखेरीमुळे महापालिका करसंकलन विभागाने थकबाकी मिळकतींवर जप्तीची धडक कारवाई सुरू केली आहे. यासाठी अधिका-यांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकाने शुक्रवारी नवी सांगवी येथील जिल्हा रुग्णालयावर कारवाई केली. करसंकलनाच्या या कारवाईने रुग्णालयाकडून थकबाकीपोटी सुमारे १३ लाख रुपयांचा धनादेश पथकामधील अधिका-यांकडे सुपूर्त केला. दरम्यान मालमत्ता करापोटीची अद्याप १ कोटी ४७ लाख रुपये देणे बाकी आहे. थकीत रक्कम देण्याबाबत महापालिकेने जिल्हा रुग्णालयाला नोटीस दिली होती. त्यामध्ये १ कोटी ४७ लाख रुपये थकीत असल्याची नोंद होती. करसंकलन विभागाने मिळकत कराच्या थकबाकीपोटी एकूण दहा मिळकतींवर जप्तीची कारवाई केली. यामध्ये सांगवीच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयावर जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाईने अनुक्रमे ८ लाख ९५ हजार ९८८ रुपये व ११ लाख ३५ हजार २३० रुपये, आकुर्डी बिगर निवासीकडून १ लाख १३ हजार २६९ रुपये, दोन व्यावसायिक मिळकतींकडून ३ लाख २२ हजार रुपये, चिखलीच्या चार मिळकतींचे ८ लाख २२ हजार आणि सांगवीच्या रुग्णालयाकडून १३ लाख रुपये असे एकूण २४ लाख ४४ हजार रुपयांची थकबाकी करापोटी धनादेशाद्वारे वसुली करण्यात आली. (प्रतिनिधी)थकीत करासंदर्भात आम्हाला नोटीस प्राप्त झालेली आहे. त्यानुसार १ कोटी ४७ लाख जमा करायचे आहेत. आमच्या विभागात याबाबत सांगितले आहे. सोमवार किंवा मंगळवारपर्यंत रक्कम मिळाल्यास कर जमा केला जाईल.- डॉ. आर. के. शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक