शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलच्या जमान्यात मैदानी खेळ गायब

By admin | Updated: July 5, 2017 03:14 IST

सध्याचा युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे म्हणजेच संगणक आणि मोबाइल अ‍ॅप्लिकेशनचे आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या संगणक आणि मोबाइल

लोकमत न्यूज नेटवर्कतळवडे : सध्याचा युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे म्हणजेच संगणक आणि मोबाइल अ‍ॅप्लिकेशनचे आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या संगणक आणि मोबाइल या संसाधनांनी सर्वच क्षेत्र व्यापून टाकली आहेत. आज घराघरांत एकापेक्षा जास्त अ‍ॅण्ड्रॉईड फोन असून, घरातील सर्वजण त्याचा सराईतपणे वापर करताना दिसत आहेत.परंतु कोणत्याही तंत्रज्ञानाचे चांगले आणि वाईट परिणाम असतात, तसेच आता हळूहळू मोबाइलचे वाईट परिणाम दिसून येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने तरुण वर्ग आणि लहान मुले यांना मोबाइलचे जणूकाही व्यसन जडले असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. सकाळी उठल्या उठल्या मोबाइल हातात घेऊन तपासणी केल्याशिवाय पुढील कोणतेही काम होत नाही. तासातासाला मोबाइलची तपासणी केली जाते. एखाद्या वेळेस मोबाइल जवळ नसल्यास चैन पडत नाही. ही आणि अशी अनेक उदाहरणे याबाबत सांगता येतील.लहान मुलांना तर मोबाइल गेमचे एवढे वेड लागले आहे की, जवळपास मोबाइल दिसल्यास लगेच त्यात कोणकोणत्या नवीन गेम आहेत या विषयी चौकशी ते करीत असतात. पाहुणे घरात आल्यावर त्यांच्याकडे कोणता मोबाइल आहे याबाबत लहानांकडून विचारणा होत असते. यामुळे घरातील थोरामोठ्यांना मात्र ओशाळल्यासारखे होते.पालकांचा प्रश्न : तंत्रज्ञान शाप की वरदानहल्ली मैदानी खेळ खेळल्याने अंग दुखत असल्याच्या तक्रारी मुले करीत आहेत. कारण त्यांना मैदानी खेळ खेळण्याची सवय राहिली नाही. त्यांना मोबाइलवर खोट्या खोट्या पण खऱ्याचा आभास निर्माण करणाऱ्या गेम आवडत आहेत. मुले नेहमी एकटे कोपऱ्यात बसून मोबाइलवर गेम खेळत असल्याचे चित्र घरोघरी बघायला मिळत आहे. त्यामुळे त्यांच्यात एकलकोंडेपणा वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. कधी काळी गावच्या चावडीत, चाळीमध्ये, गल्लीत खेळले जाणारे लपाछपी आणि चोर-पोलीस यांसारखे सामूहिक खेळ लुप्त होत असून, त्याऐवजी मोबाइलचा हॉटस्पॉट चालू करून पाच-सहा जणांचा ग्रुप करून सामूहिक मोबाइल गेम खेळणाऱ्या मुलांचा समूह जागोजागी दिसतात.