शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

१३५ पैकी १६ उद्यानांनाच वाहनतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 02:54 IST

उद्यानांसाठी पार्किंगची व्यवस्थाच नाही; महापालिकेच्या उद्यान विभागाची उदासीनता

- प्रकाश गायकर पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर हे उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरामध्ये अनेक छोटी-मोठी उद्याने विकसित करण्यात आली आहेत. मात्र या उद्यानांमध्ये नागरिकांना सोयी-सुविधा देण्यासाठी उद्यान प्रशासन असमर्थ ठरताना दिसत आहे. शहरामध्ये एकूण १३५ सार्वजनिक उद्याने आहेत. त्यापैकी केवळ १६ उद्यानांनाच वाहनतळाची सोय करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उर्वरित सर्वच उद्यानांमध्ये नागरिकांना वाहने बेभरवश्यावर सोडावी लागत आहेत.दिवसेंदिवस पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार होत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबरच शहरातील वाढत्या वाहनांच्या वाहनतळाचा प्रश्नही गंभीर होत आहे. उद्यानांमध्ये वाहनतळाअभावी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने शहरातील विविध भागात सुमारे १३५ सार्वजनिक व प्रशस्त उद्यानांची निर्मिती केली आहे. मात्र असे असताना त्या उद्यानांना वाहनतळाची सुविधा देण्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ज्या थोड्या बहुत ठिकाणी वाहनतळाची सुविधा आहे तेथेही नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. जागा तोकडी असल्याने अनेक वेळा वाहतुककोंडी व त्यातून होणाऱ्या वादांचा सामना करावा लागत आहे. परिणामी उद्यानांना भेट देताना नागरिकांना ‘उद्यानाला भेट नको रे बाबा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.अनेक उद्याने ही रहिवाशी परिसरामध्ये आहेत. त्यामुळे उद्यान परिसरातील रहिवाशांना वाहनतळाअभावी होणाºया गोंगाटाचा त्रास सहन करावा लागतो. महापालिका कोट्यावधी रुपये खर्च करून उद्यानांची निर्मिती करत आहे. मात्र भौतिक सुविधा देण्याकडे दुर्लक्ष केल्याने उद्यानांची रया जात आहे. दिवसेंदिवस वाहतुककोंडीची समस्या उग्र रुप धारण करत असताना उद्यानांना प्रशासनाने वाहनतळाची सोय करण्याची मागणी नागरिक करत आहेत.कारवाई : आर्थिक भुर्दंडासह मानसिक ताणहीउद्यानात जाऊन थोडावेळ विरंगुळा करावा, सुट्टी आनंदात घालवावी असा विचार करून नागरिक उद्यानांमध्ये जातात. मात्र सोबत नेलेले वाहन कुठे उभे करायचे हा प्रश्न पडतो. रस्त्यावर आपले वाहन लावून उद्यानातून परतल्यावर बºयाचदा दुचाकी वाहन वाहतूक पोलिसांनी नेलेले असते. तर चारचाकींना जॅमर लावलेले असते. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात घालविलेल्या आनंदाच्या क्षणांंवर विरजण पडते. वाहन सोडविण्यासाठी अर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्याचबरोबर मानसिक ताण सहन करावा लागतो तो वेगळाच. त्यामुळे उद्यानांना भेट न दिलेलीच बरी, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.उद्यान विभागाच्या अखत्यारित वाहनतळाचा विषय येत नाही. त्यामुळे त्याबद्दल काही सांगता येणार नाही. आमच्याकडे उद्यानाची निर्मिती झाल्यानंतर त्याची देखभाल करणे ही जबाबदारी आहे.- सुरेश साळुंखे, मुख्य अधीक्षक, उद्यान विभाग, महापालिका

टॅग्स :Parkingपार्किंगpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड