शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षेसाठी उस्मानाबाद पॅटर्न

By admin | Updated: February 7, 2016 03:42 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दर वर्षी काही दिवसांकरिता रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. रस्ता वापर संस्कृती या आदर्श संस्काराचे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दर वर्षी काही दिवसांकरिता रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. रस्ता वापर संस्कृती या आदर्श संस्काराचे बीजारोपण शालेय वयातच व्हायला हवे, यासाठी उपप्रादेशिक परिवहन सहायक अधिकारी विनोद चव्हाण यांनी सुरू केलेला रस्ता सुरक्षेचा उस्मानाबाद पॅटर्न आता राज्यभरात राबविला जात आहे. दर वर्षी केवळ औपचारिकता म्हणून पंधरा दिवस वाहतूक विभागाकडून जनजागृती कार्यक्रम राबविला जातो. मात्र ठोस आणि दीर्घकालीन परिणाम साधण्यासाठी नवीन प्रयत्नांची गरज असल्याने चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना समजेल, अशी सहज साध्या-सोप्या भाषेत एक पुस्तिका तयार केली. उस्मानाबाद जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांनी या माध्यमातून दीड लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. वाहतूक नियमांचा हा अभ्यासक्रम आता राज्यभरात रस्ता सुरक्षेचा उस्मानाबाद पॅटर्न या नावाने स्वीकारण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड येथे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर चव्हाण रुजू झाले. त्यांनी शहरातील शिक्षण विभाग २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात रस्ता सुरक्षेचा उस्मानाबाद पॅटर्न ३५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. यंदादेखील काही शाळांमधून चव्हाण यांच्या पुढाकाराने रस्ता सुरक्षा उस्मानाबाद पॅटर्न राबविला गेला. जवळपास ४० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षेच्या नियमांबाबत अभ्यास करून परीक्षा दिली. या उपक्रमाच्या संकलनातून चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे ‘रस्ता सुरक्षा उस्मानाबाद पॅटर्न’ हे पुस्तक देखील राज्यातील वाचकांसाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)काय आहे उस्मानाबाद पॅटर्न असा एकही दिवस नाही, ज्या दिवशी अपघातामुळे कोणाचे तरी निधन झाल्याचे वृत्त ऐकावयास मिळत नाही. मानवनिर्मित संकटामुळे ओढावलेली अपघात नावाची समस्या आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक प्रश्नांचे गांभीर्य प्रचंड तीव्र झाले आहे. या तीव्रतेला छेद देण्यासाठी रस्ता सुरक्षा उस्मानाबाद पॅटर्नच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घेतलेली सकारात्मक झेप राज्य सरकारला दखल घेण्यास भाग पडली. दोन लाख विद्यार्थ्यांपर्यंत वाहतूक शिक्षणाचे संस्कार पोहोचविण्याचे काम मी केले आहे आणि या उस्मानाबाद पॅटर्नच्या माध्यमातून पुढील काळातही लाखो विद्यार्थ्यांना रस्ता वापर संस्कृतीचे आदर्श मूल्य सातत्याने मिळत राहणार आहे. विद्यार्र्थिदशेतच रस्ता सुरक्षेबाबत जागृतीचे आत्मभान या विद्यार्थ्यांना मिळू शकले. - विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन सहायक अधिकारी