शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराष्ट्र बनणार मंच’चे सोमवारी चिंचवडला आयोजन

By admin | Updated: May 7, 2017 02:51 IST

कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी परत एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित ‘महाराष्ट्र बनेगा मंच’ हा नावीन्यपूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी परत एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित ‘महाराष्ट्र बनेगा मंच’ हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम सदस्यांच्या भेटीला येत आहे. गोव्यासह महाराष्ट्रात महिलांच्या मनामनात राज्य करणारे लोकमत सखी मंच आणि लोकप्रिय चॅनल कलर्स परत एकदा सज्ज झाले आहे कलाकारांंना प्रोत्साहन देण्यासाठी. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी काही ना काही कला असते. फक्त त्या कलेला एक मंच हवा असतो आणि हा मंच देण्याचा प्रयत्न कलर्स प्रस्तुत लोकमत सखी संच आयोजित ‘महाराष्ट्र बनेगा मंच’ या कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमात वेगळेपण म्हणजे कुठल्याही परीक्षकाशिवाय ही स्पर्धा संपन्न होणार आहे. तुमच्या शहरातील जनता ठरविणार. विजेता तेही तुमच्या नजरेसमोर हा कार्यक्रम आज सोमवार, दि. ८ रोजी सायंकाळी ५ वा. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे आयोजित केला असून यात तुम्हाला येत असलेल्या अशा कलेचे प्रदर्शन तुम्हाला करायचे आहे, जी कला तुम्ही मंचावर प्रस्तुत करू शकाल. हाच कार्यक्रम महाराष्ट्रात कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित आता महाराष्ट्र बनणार मंच, ज्यात सोलो, ड्युएट किंवा ग्रुप नृत्य, अभिनय, मिमिक्री, पेंटिंग, वादन, जादूचे प्रयोग, जिमनॅस्टिक, आॅक्रेस्ट्रा, कवायत, योगासने, कठपुतली, मेकअप आर्ट, कीर्तन, भजन, भारूड, खंजिरी वादन, ढोल पथक इत्यादी व यासारखे कलाप्रकार सादर करता येईल. सादर करण्यासाठी लागणारे साहित्य स्पर्धकांनी स्वत: आणावे. तेव्हा भाग घ्या आणि जिंका भरपूर बक्षिसे. कलर्स चॅनलने आपल्या चोखंदळ प्रेक्षकांसाठी एका नाविन्यपूर्ण शो चे आयोजन केले आहे. ‘इंडिया बनेगा मंच’ या नावातच याचे वेगळेपण दडले आहे.एका टॅलेंट शो ला अशा पद्धतीने सादर करणे म्हणजे सर्व कलाकारांना आपल्या प्रतिभेला जनतेसमोर आणण्याचे प्रोत्साहन देणे होय. हा कार्यक्रम कलर्स चॅनलवर ७ मे पासून प्रत्येक शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता प्रक्षेपित होणार आहे. या अंतर्गत भारतातील प्रमुख शहरांमध्ये नावाजलेल्या जागांवर, चौकांमध्ये किंवा मॉलमध्ये या कार्यक्रमाअंतर्गत कलाकार सामील होऊ शकतील आणि आपल्या प्रतिभेला पंख देतील. कुठल्याही परीक्षकांशिवाय कोलकाताचा हावडा ब्रिज, दिल्लीचा लाल किल्ला, इंडिया गेट, मुंबईची जुहू चौपाटी अशा सुविख्यात नावाजलेल्या जागी कलाकारांचा कलाविष्कार आणि भारतीय जनतेचा कौल अशा पद्धतीने हा कार्यक्रम चॅनलवर रंगणार आहे.आपल्या शहरात सोमवारी (दि. ८) या दिवशी ‘महाराष्ट्र बनणार मंच’ होत आहे. यामध्ये भाग घेऊन जिंका आकर्षक पुरस्कार. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी ०२०-६७३४५६७८ या क्रमांकावर संपर्क करा. ही स्पर्धा पाहण्यासाठी सखी मंच सदस्यांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात येत आहे.