रावेत : चौकाचौकांत उभारलेले बेकायदा फ्लेक्स आणि बॅनर उतरविण्याकडे महापालिकेचे होत असलेले दुर्लक्ष रावेत, वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा चौक, चिंतामणी चौक, बिजलीनगर आदी भागाच्या विद्रूपीकरणाला कारणीभूत ठरत आहे. परिसरात उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांमध्ये मोजक्याच जाहिरातफलकांची रीतसर परवानगी घेण्यात आली आहे. न्यायालयाने बजावल्यानंतर शहर चकाचक करण्याची घोषणा केलेल्या प्रशासनाकडून केवळ कारवाई सुरू असल्याचे सांगितले जात आहे.वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांवरील दिशादर्शक फलकांवरही फ्लेक्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून जागोजागी फ्लेक्स, बॅनर, फलक दिसून येत आहेत. ते हटविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली असली, तरी त्यावर महापालिकेकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार आमची कारवाई क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागामार्फत सतत सुरू असते. रावेत आणि इतर उपनगरातील परिसरात असणाऱ्या अनधिकृत फ्लेक्सबाबतीत ३१ जानेवारीपर्यंत सर्वच क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे. - औदुंबर तुपे, कार्यालय अधीक्षक, आकाशचिन्ह आणि परवाना विभाग
न्यायालयाचा आदेश धाब्यावर
By admin | Updated: February 3, 2016 00:39 IST