शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘गाजर' हातात घेत शास्तीकर माफीसाठी महापालिका प्रवेशद्वारासमोर विरोधकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 16:51 IST

अनधिकृत बांधकामे नियमितीकरण व शास्तीकर माफीबाबत दिलेला शब्द पाळला नाही.

ठळक मुद्देसंपूर्ण शास्तीकर माफी,  अनियमित बांधकामे नियमितीकरण, रेड झोन, रिंग रोड असे अनेक प्रश्न प्रलंबित

पिंपरी-चिंचवड : शहरातील अवैध बांधकामांचा शास्तीकर माफ करावा, अनियमित बांधकामे नियमितीकरण, रेडझोन, रिंग रोडबाबतच्या प्रश्नांकडे सत्ताधारी भाजपा व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी,  दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी विरोधी पक्ष, विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आज  (सोमवारी) महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. 'गाजर' हातात घेऊन सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहरप्रमुख योगेश बाबर, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे,  मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, शेकापचे हरीष मोरे, स्वराज इंडिया अभियानाचे मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, नगरसेविका वैशाली घोडेकर, माजी नगरसेविका मंदा आल्हाट, छावा संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळकर, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, रोमी संधू, राजू सावळे तसेच विविध पक्ष आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी हातात गाजरे घेऊन सहभागी झाले आहेत. 

.........................

महापालिका, नवनगर विकास प्राधिकरण, एमआयडीसी व म्हाडा क्षेत्रातील वषार्नुवर्षे भिजत पडलेल्या संपूर्ण शास्तीकर माफी,  अनियमित बांधकामे नियमितीकरण, रेड झोन, रिंग रोड असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीची धास्ती 15 दिवसात घालवू या..! दिलेल्या आश्वासनाची पुर्तता केली नाही. 

अनधिकृत बांधकामे नियमितीकरण व शास्तीकर माफीबाबत दिलेला शब्द पाळला नाही. 9 जानेवारीला चिंचवडमधील जाहीर कार्यक्रमात पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीची धास्ती 15 दिवसात घालवू असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. ही मुदत 24 जानेवारीलाच संपली आहे. मात्र, प्रश्व सुटला नाही. त्यामुळे ही घोषणाही 'गाजर'च निघाले. या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे, आंदोलकांनी सांगितले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसshravan hardikarश्रावण हर्डिकर