शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टीवाढीस लघुउद्योगकांचा विरोध

By admin | Updated: April 1, 2017 01:41 IST

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पाणीपट्टी वाढवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पाणीपट्टी वाढवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यास पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेने विरोध करत तीन तास पाणीपुरवठा करण्याची तसेच पाणी दरात कपात करण्याची मागणी केली आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील सेक्टर नंबर ७ ,१०, कुदळवाडी, तळवडे, शांतीनगर या परिसरात महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून ३० रुपये प्रतिहजार दराने उद्योगांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु, हा पाणी पुरवठा फक्त एक वेळ आणि तो देखील अत्यंत कमी दाबाने व कमी वेळ केला जातो. त्यामुळे बऱ्याच वेळा उद्योजकाना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील कामगारांना पिण्यासाठी व इतर कामासाठी केला जातो. या पाण्याचा कोणताही व्यावसायिक वापर केला जात नाही. तरीही पिंपरी-चिंचवड पालिकेकडून व्यावसायिक दराने पाणीपट्टी अकारली जाते, असे संघटनेचे म्हणणे आहे.प्रस्तावित पाणी पट्टीवाढ रद्द करुन सध्या आकारला जाणारा दरसुद्धा कमी करावा व उद्योगांना दिवसातून किमान दोन वेळा पूर्ण दाबाने तीन तास तरी पाणी पुरवठा करण्यात यावा. लघुउद्योजक मंदीमुळे अडचणीत आहेत. त्यातच पालिकेने पाणीपट्टीत वाढ केल्यास लघुउद्योजकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)या बाबत बोलताना पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रस्तावित पाणी पट्टीवाढीचा निर्णय हा उद्योजकावर अन्यायकारक आहे. पलिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहिन्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी गळती होऊन पाणी वाया जाते. पाणी मीटर सदोष असल्यामुळे उद्योजकांना चुकीची बिल दिले जाते. उद्योगांना दिवसातून किमान २ वेळा पूर्ण दाबाने तीन तास तरी पाणी पुरवठा करावा, यासाठी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना गेली ७ ते ८ वर्षांपासून पालिकेकडे पाठपुरवा करत असून पालिकेकडून फक्त आश्वासन दिले जाते.