शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी, उपसूचनांवरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 03:00 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपसूचना घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत चांगलीच जुंपली होती.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपसूचना घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत चांगलीच जुंपली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी भाजपााला धारेवर धरले. ‘विरोधात असताना भाजपाचे पदाधिकारी राष्ट्रवादीने उपसूचनांद्वारे पैसे कमावले. भ्रष्टाचार केला, असे आरोप करत होते. मग, आता प्रत्येक विषयाला उपसूचना का घेतल्या जात आहेत. उपसूचनांमधून सत्ताधाºयांना कमाई करायची आहे. उपसूचनांविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा विरोधी पक्षाने दिला आहे. तर तुमच्याकडूनच आम्ही शिकलो, अशी टिप्पणी भाजपाने केल्याने वादात भर पडली.नेहरुनगर येथील गुलाबपुष्प उद्यानाजवळील उद्यान विभागाच्या जागेवर संगोपन केंद्र उभारण्याचा विषय होता. त्या विषयाला सत्ताधाºयांनी उपसूचना मांडली. परंतु, ती पूर्ण वाचली नाही. ती पूर्ण वाचण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीने उपसूचनांमधून पैसे कमविल्याचे खोटे-नाटे आरोप भाजपाने विरोधात असताना केले. त्याचा डंका पिटला. मग आता प्रत्येक विषयाला उपसूचना का घेतल्या जातात? शिवाय ती पूर्णपणे वाचली जात नाही. उपसूचना संपूर्ण वाचली गेली पाहिजे. उपसूचनेचा हेतू काय, कोणत्या नगरसेवकाच्या प्रभागातील ती उपसूचना आहे, त्याची संबंधित नगरसेवकाला माहिती दिली गेली पाहिजे. बहुमताच्या जोरावरकाय काळा कारभार करायचा आहे तो करा; परंतु, किती गैरकारभारकरायचा याचे भान ठेवावे. बहुमताच्या जोरावर चुकीचे काम करणार असतील, तर त्या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल.’’सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादावादी सुरू असतानाच महापौर नितीन काळजे यांनी, सदस्यांनी आपापसात बोलू नये. सर्वांचे म्हणणे ऐकून घ्यावे. तसेच यापुढे उपसूचना पूर्णपणे वाचण्याच्या सूचना दिल्या.माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या, ‘‘उपसूचना सविस्तर वाचल्या पाहिजेत. कोणत्या-कोणत्या कामासाठी किती निधी दिला जाणार आहे. त्याची नगरसेवकांना माहिती दिली गेली पाहिजे. प्रशासकीय मान्यतेच्या उपसूचना नगरसेवकांना सांगितल्या पाहिजेत.’’दत्ता साने म्हणाले, ‘‘उद्देश चांगला असेल, तर उपसूचना पूर्ण वाचायला काय अडचण आहे. उपसूचना वाचण्यासाठी पाच, दहा मिनिटे किंवा खूपच मोठी उपसूचना असेल तर एक तास लागेल. त्याला काय झाले? महिन्यातून त्यासाठी तर सर्वसाधारण सभा घेतली जाते.’’शिवसेनेच्या मीनल यादव म्हणाल्या, ‘‘आयुक्त उपसूचना घेतात. मंजूर करतात. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र विषय समितीत तर विरोधकांचे विषय दाखलदेखील करून घेतले जात नाहीत. हा आमच्यावर अन्याय आहे. तो सहन केला जाणार नाही.’’भाजपाच्या आशा शेंडगे म्हणाल्या, ‘‘पंचवीस वर्षांत सभागृहात कधीही उपसूचना पूर्णपणे वाचली नाही. वेगवेगळ्या उपसूचना घेतल्या आहेत. परंतु, जे उपसूचना वाचत नव्हते तेच ती पूर्ण वाचण्याची मागणी करीत आहेत. आपण कसे सभागृह चालविले हे आम्ही पाहिले आहे. आपल्याकडूनच आम्ही शिकलो आहोत.’’

टॅग्स :Politicsराजकारणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड