शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसमावेशक गटांना संधी

By admin | Updated: March 24, 2017 04:06 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विषय समिती सदस्यांची निवड आज झाली. त्यात भाजपातील सर्वसमावेशक नगरसेवकांना

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विषय समिती सदस्यांची निवड आज झाली. त्यात भाजपातील सर्वसमावेशक नगरसेवकांना संधी दिली आहे. पिंपरी, चिंचवड किंवा भोसरी विधानसभा असा विचार न करता नगरसेवकांमधील गुणवत्तेला सदस्यनिवडीत प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. पालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची सर्वसाधारण सभेत निवड झाली आहे. त्यामध्ये संख्याबळानुसार भाजपाच्या १०, राष्ट्रवादीचे ४, शिवसेना १ आणि अपक्षांचा १ नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत.भाजपाचे सीमा सावळे, आशा शेंडगे, लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, उत्तम केंदळे, उषा मोंढे, माधुरी कुलकर्णी, हर्षल ढोरे, निर्मला कुटे, कोमल मेवानी यांची, तर राष्ट्रवादीकडून अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, शिवसेनेकडून अमित गावडे, अपक्षांकडून कैलास बारणे यांची वर्णी लागली आहे.क्रीडा, कला, साहित्य, व सांस्कृतिक समिती सदस्यपदी अंबरनाथ कांबळे, भीमाबाई फुगे, बाळासाहेब ओव्हाळ, लक्ष्मण सस्ते, राजेंद्र गावडे (भाजपा), मंगला कदम, डब्बू आसवानी, राजू बनसोडे (राष्ट्रवादी), अ‍ॅड. सचिन भोसले (शिवसेना) यांची निवड झाली आहे. विधी समिती सदस्यपदी शारदा सोनवणे, स्विनल म्हेत्रे, सुरेश भोईर, अश्विनी जाधव, शीतल शिंदे (भाजपा) सविता काटे, संतोष कोकणे, जावेद शेख (राष्ट्रवादी), मीनल यादव (शिवसेना) यांची निवड झाली आहे. शहर सुधारणा समिती सदस्यपदी विकास डोळस, शैलेश मोरे, सागर गवळी, शशिकांत कदम, संतोष कांबळे (भाजपा), मयूर कलाटे, गीता मंचरकर, विनया तापकीर (राष्ट्रवादी), अश्विनी वाघमारे (शिवसेना) यांची निवड झाली आहे. महिला व बालकल्याण समितीपदी योगिता नागरगोजे, सुनीता तापकीर, चंदा लोखंडे, सोनल गव्हाणे, सागर आंगोळकर (भाजपा), सुलक्षणा शिलवंत, निकीता कदम, डॉ. वैशाली घोडेकर (राष्ट्रवादी), रेखा दर्शले (शिवसेना) यांची निवड झाली आहे. (प्रतिनिधी)