शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ओपन जीमचे आरोग्य धोक्यात; महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 02:50 IST

टवाळखोरांकडून साहित्याची मोडतोड; दुरुस्तीची स्थानिक नागरिकांकडून मागणी

सांगवी : महापालिकेच्या जुन्या सांगवीतील छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानातील ओपन जीमच्या साहित्याची टवाळखोरांनी मोडतोड केली आहे. साहित्य वापराविना पडून आहे. महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने या साहित्याची अधिकच दुरवस्था होत आहे. त्यामुळे नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या या ओपन जीम उपक्रमाच्या हेतूला हरताळ फासला जात आहे.आरोग्य उत्तम राहावे म्हणून नागरिक हिवाळ्यात व्यायामावर भर देतात. व्यायामासाठीचे साहित्य सहज उपलब्ध व्हावे म्हणून ‘ओपन जीम’ ही संकल्पना उदयास आली. त्यानुसार महापालिकेने शहरातील काही भागात उद्यानांमध्ये ‘ओपन जीम’ सुरू केली. मात्र त्यानंतर या जीममधील साहित्याची दुरुस्ती आणि देखभाल याकडे महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी जीममधील साहित्याची मोडतोड होऊन दुरवस्था झाली. त्यामुळे ‘ओपन जीम’चेच आरोग्य धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत उपाययोजना करून साहित्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.सांगवी परिसरात महापालिकेची चार उद्याने आहेत. यातील एक पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान सध्या काही महिन्यांपासून विकसित करण्यासाठी बंद असून, इतर तीन उद्यानांमधील सर्वांत मोठे मधुबन सोसायटी येथील छत्रपती शिवाजीमहाराज उद्यान अनेक कारणांनी प्रसिद्ध असून, येथील फुलांची व इतर अनेक प्रकारची झाडे सुंदर असून वेगळ्या पद्धतीने हे उद्यान नागरिकांचे विरंगुळा व आकर्षणाचे ठिकाण आहे. येथील विविध प्रकारच्या सुविधा व स्वच्छता खास असून लहान मुले व जेष्ठ नागरिक व परिसरातील नागरिकांची येथे गर्दी दिसून येते.या उद्यनाच्या डाव्या बाजूला सकाळी व संध्याकाळी येणाऱ्या परिसरातील नागरिकांसाठी महापालिकेकडून ओपन जीमसाठी लागणारी साधने उपलब्ध करून दिली. मात्र या साहित्याची टवाळखोरांकडून मोडतोड करण्यात येत आहे.मुळातच साहित्य कमी असताना आहे त्याची मोडतोड होत आहे. फोम शीट लोखंडी बारवरून गायब झाल्याचे दिसून येते. लोखंडी रॉड उघडे पडले असून, दुसºया साहित्याची पूर्ण व्यायाम करण्यासाठी लागणारी प्रक्रिया बंद असून त्याचे पेडल व हँडल तुटले असल्याचे ‘लोकमत पाहणी’तून दिसून आले.ओपन जीममध्ये केवळ चार साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परिसरातील लोकसंख्या बघता साहित्य कमी असल्याचे दिसून येते. महापालिका कर्मचाºयांची नजर चुकवून टवाळखोर या साहित्याची मोडतोड करतात. टवाळखोरांना हटकण्याचा प्रयत्न केला तर ते गुंडगिरीची भाषा करतात. त्यामुळे त्यांना कोणीही बोलत नाही, असे स्थानिकांनी सांगितले. यासाठी कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.ओपन जीममध्ये व्यायामासाठी चार प्रकारचे साहित्यव्यायामासाठी उद्यानात येणाºयांच्या तुलनेत साहित्य कमीउद्यानासाठी केवळ एक उद्यान निरीक्षक, एक कर्मचारी व एक माळीकायमस्वरूपी सुरक्षारक्षक नियुक्त करण्याची मागणीदुपारी उद्यान बंद असताना कोणासही प्रवेश देऊ नयेनोटीस व सूचनाफलकाची मागणीसाहित्याची महिन्यातून दोनदा पाहणी व दुरुस्ती व्हावीजीममधील साहित्य संख्या वाढवण्यात यावीओपन जीममधील तुटलेल्या साहित्याची पाहणी करून अहवाल क्रीडा विभागाकडे दिला आहे. त्या संदर्भात वरिष्ठ अधिकारी व महापालिकेकडून लवकरच याबाबत दखल घेण्यात येईल.- जे. व्ही. पटेल,उद्यान निरीक्षक, महापालिकायेथे व्यायामासाठी केवळ चार प्रकारचे साहित्य आहे. त्या तुलनेत व्यायामासाठी येथे येणाºया नागरिकांची संख्या जास्त आहे. परिणामी व्यायामासाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यात वेळेचा अपव्यय होतो. टवाळखोर मुले साहित्याची मोडतोड करतात.- राजेंद्र कोकाटे,रहिवासी, सांगवी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड