शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन विवाह जुळविणे पडले महागात, महिलेने घातला दीड लाखाचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 01:41 IST

पिंपरी : विवाह जुळविणा-या संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करून माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे एका महिलेने तरुणाशी संपर्क साधून पैशाची तातडीची गरज असल्याचे कारण पुढे करीत तरुणाला तिच्या खात्यात दोन लाख रुपये भरण्यास भाग पाडले.

पिंपरी : विवाह जुळविणा-या संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करून माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे एका महिलेने तरुणाशी संपर्क साधून पैशाची तातडीची गरज असल्याचे कारण पुढे करीत तरुणाला तिच्या खात्यात दोन लाख रुपये भरण्यास भाग पाडले. ही रक्कम महिलेच्या खात्यात जमा केल्यानंतर मात्र महिलेने त्यांच्याशी संपर्क साधण्याचे, मोबाइलवर प्रतिसाद देण्याचे टाळले. त्यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने सांगवी पोलीस ठाण्यात महिलेविरोधात फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश विलास पाटील (वय ३६, रा. जुनी सांगवी) असे फिर्याद दाखल करणाºया तरुणाचे नाव आहे. या तरुणाने आॅनलाइन विवाह जुळविणाºया संस्थेकडे नोंदणी करून संकेतस्थळावर स्वत:ची माहिती दिली होती. त्या माहितीच्या आधारे काव्या नावाच्या महिलेने पाटील यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला. व्हॉट्स अ‍ॅपवर त्या महिलेने पाटील यांच्याबरोबर संपर्क वाढवला. त्यांचा विश्वास संपादन केला.व्हॉट्स अ‍ॅपवर पाटील यांना संपर्क साधून वडिलांना हृदयविकाराचा झटका आला असून, वैद्यकीय उपचारासाठी पैशांची अत्यंत गरज आहे, असे सांगितले.एवढेच नव्हे, तर रक्कम आपल्या बँक खात्यात आॅनलाइन जमा करण्यास सांगितले. भावनिक होऊन पाटील यांनी संबंधित महिलेने सांगितलेल्या युनियन बँकेच्या एका खात्यात सुरुवातीला दीड लाख रुपये जमा केले. १५ दिवसांचा अवधी गेल्यानंतर त्या महिलेने आणखी ५०हजार रुपयांची गरज असल्याचे पाटील यांना कळविले. पाटीलयांनी महिलेने मागणी केल्यानुसार आणखी ५० हजार रुपये खात्यात जमा केले.दोन लाख रुपये महिलेने सांगितलेल्या खात्यावर जमा केल्यानंतर मात्र महिलेने २३ आॅक्टोबरपासून पाटीलयांच्याशी संपर्क तोडला. पाटील यांच्या फोनला प्रतिसाद देणेही बंद केले. पैसे मिळाल्यानंतरमहिलेने संपर्क साधणे बंद केल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले.महिलेचा पत्ता माहिती नसल्याने तिच्यापर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे पाटील यांनी थेट सांगवी पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.>पतपेढीतील २५ हजारांचा मुद्देमाल लंपासपिंपरी : शिवसह्याद्री सहकारी पतपेढीच्या संभाजीनगर येथील कार्यालयाचे ग्रील उचकटून कार्यालयातून चोरट्याने राऊटर मशिनसह सुमारे २५ हजारांचा मुद्देमाल लांबविला. ही घटना सोमवारी रात्री घडली. पतपेढीचे व्यवस्थापक शंकर शेलार (वय ३३, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शिवसह्याद्री सहकारी पतपेढी मर्यादित, संभाजीनगर या शाखेच्या कार्यालयात व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी सातच्या सुमारास पतपेढीचे कार्यालय बंद झाले होते. त्यानंतर रात्री अज्ञात चोरट्याने कार्यालयाचे लोखंडी ग्रील उचकटून आत प्रवेश केला. कार्यालयातील इंटरनेट यंत्रणेतील काही उपकरणे आणि अन्य माल असा एकूण २५ हजार किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.