पिंपरी : चिंचवड प्रभाग क्रमांक १९ मध्ये मतदारांना पैसे वाटप केल्याचा प्रकार घडला असताना शाहूनगर, संभाजीनगर, मोरवाडी या प्रभाग क्रमांक १० मध्ये मोहनगर परिसरात असाच प्रकार घडला. पैसे वाटप करणारा आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा नातेवाईक आहे. आरोपींकडून एक लाख ४४ हजारांची रोकड जप्त करण्यात आली.भगवान सदाशिव नामदे (वय ३८, मोहननगर, चिंचवड), दादा पाटील (४५, रा. रामनगर, चिंचवड) अशी पैसे वाटणाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्यासह दोन साथीदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
दीड लाखाची रोकड जप्त
By admin | Updated: February 20, 2017 02:46 IST