शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

शहरात अकरापैकी एकाच गुन्ह्याचा छडा

By admin | Updated: November 22, 2015 03:35 IST

शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी आणि चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, गेल्या तीन महिन्यांत सोनसाखळी चोरीच्या ११ घटना घडल्या आहेत. त्यांपैकी फक्त एकच गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला

पिंपरी : शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी आणि चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, गेल्या तीन महिन्यांत सोनसाखळी चोरीच्या ११ घटना घडल्या आहेत. त्यांपैकी फक्त एकच गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. दिवसाढवळ्या पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला जात असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खाकीचा धाक नसल्यामुळेच सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या असून, यामुळे असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.शहरातील असा एकही रस्ता नाही, ज्या ठिकाणाहून पादचारी महिलेची सोनसाखळी चोरीला गेली नसेल. प्रत्येक रस्त्यावर सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत.काही ठिकाणी तर घराबाहेर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील, तर काही ठिकाणी हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे असतानाही सोनसाखळी चोरीला गेल्याच्या घटना घडत आहेत. तीन महिन्यांत पिंपरी, भोसरी, चिंचवड, निगडी, भोसरी औद्योगिक परिसर या ठिकाणांहून तब्बल दहा लाखांच्या किमतीच्या सोनसाखळ्या चोरीला गेल्या आहेत. आॅगस्ट महिन्यात निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन, भोसरी औद्योगिक परिसरात दोन, तर पिंपरी येथे एका ठिकाणी सोनसाखळी चोरीची घटना घडली. यामध्ये सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीच्या सोनसाखळी चोरीला गेल्या आहेत. पोलिसांना सहा गुन्ह्यांपैकी निगडीतील तीनपैकी एकच गुन्हा शोधण्यात यश आले असून, इतर गुन्ह्यांचा तपासही अद्याप सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात चिंचवड येथेच चोरीची एक घटना घडली असून, सव्वालाखांची सोनसाखळी चोरीला गेली आहे. तर आॅक्टोबर महिन्यातही पिंपरी, निगडी, भोसरी व भोसरी औद्योगिक परिसर येथे सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. यामध्ये अडीच लाखांची सोनसाखळी चोरीला गेली आहे.(प्रतिनिधी)