शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी, कर्मचारी सापडले कात्रीत

By admin | Updated: October 3, 2015 01:27 IST

अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे रोखण्यासाठी महापालिकेने यंत्रणा उभी केली आहे. ही बांधकामे न रोखल्यास त्या यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे

मंगेश पांडे, पिंपरीअनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे रोखण्यासाठी महापालिकेने यंत्रणा उभी केली आहे. ही बांधकामे न रोखल्यास त्या यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, अनधिकृत बांधकाम करणाऱ्याला नोटीस न देण्यापासून ते कारवाई करण्यास जाऊ नये, यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधीच दबाव टाकत असल्याने अधिकारी, कर्मचारीच कात्रीत सापडले आहेत. शहरात बांधकामे सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यासह नऊ बीट निरीक्षकांवर नुकताच कारवाईचा बडगा उगारला आहे. या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. शहरातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी महापालिकेचा अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलन विभाग कार्यरत आहे. अतिक्रमण नियंत्रण व निर्मूलनाबाबत उपाययोजना करण्यासाठी महापालिकेचे पदनिर्देशित अधिकारी व बीट निरीक्षक यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. मात्र, तरीही शहरात बांधकामे सुरू आहेत. अनधिकृत बांधकामांचा आढावा घेतला असता, या अधिकारी, कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या बीट क्षेत्रामध्ये २७ बांधकामे अनधिकृतरित्या उभी राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. बांधकाम नियमितीकरणाचा निर्णय नाहीच मार्च २०१२नंतर शहरात पुन्हा अनधिकृत बांधकामे उभी राहू नयेत, यासाठी महापालिकेला आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार अशा बांधकामांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, यासाठी महापालिकेने यंत्रणा उभी केली आहे. तर दुसरीकडे २०१२पूर्वीची बांधकामे नियमितीकरणाचा प्रश्न अजूनही लटकलेला आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये या प्रश्नी केवळ आश्वासनेच मिळाली आहेत. बांधकामांचे नियमितीकरण कधी होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाकडून नाही संरक्षणमहापालिका अधिकारी, कर्मचारी कारवाईसाठी त्या ठिकाणी गेल्यानंतर लगेचच बांधकामधारक लोकप्रतिनिधींना कळवितात. त्या लोकप्रतिनिधींचा महापालिका अधिकाऱ्याला फोन येतो. त्यामुळे सर्व प्रक्रियाच रखडते. या परिस्थितीत स्थानिक पातळीवरील अडचणींकडे दुर्लक्ष होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.बीट निरीक्षकांवर जबाबदारीनव्याने अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, याकडे गांभीर्याने लक्ष देणे महत्त्वाचे बनले आहे. तरीही अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने बांधकामे सुरू असल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारांना आळा बसावा, यासाठी प्रत्येक क्षेत्रात वेळोवेळी पाहणी करण्यासाठी महापालिकेने कार्यकारी अभियंता आणि बीट निरीक्षक नेमले. त्यांच्यावर विशेष जबाबदारीही देण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामे उभी राहिल्याचे आढळल्यास बीट निरीक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावरच कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. मात्र, याची दुसरीही एक बाजू आहे. बीट निरीक्षक तसेच कारवाईसाठी जाणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची तसेच त्यांचे मनोबल वाढविण्याची गरज आहे.