शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By admin | Updated: July 17, 2017 04:08 IST

शुक्रवारपासून (दि १४) दत्त मंदिर परिसर, वाकड येथील कित्येक सोसायट्यांचा विद्युतपुरवठा गेले ३६ ते ४८ तासांपेक्षा अधिक वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कवाकड : शुक्रवारपासून (दि १४) दत्त मंदिर परिसर, वाकड येथील कित्येक सोसायट्यांचा विद्युतपुरवठा गेले ३६ ते ४८ तासांपेक्षा अधिक वेळ अचानक खंडित झाल्याने रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सातत्याने पाठपुरावा करूनदेखील समस्या सुटत नसल्याचे अखेर रहिवाशांनी महावितरण अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करून समस्यांचा पाढा वाचला. वाकडमधील दत्तात्रय देशमुख (मॅक्झिमा सोसायटी), युवराज हुगे व बाळकृष्ण कलाटे (नंदन इन्स्पेरा सोसायटी) या रहिवाशांनी या बैठकीच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. वाकडच्या विविध सोसायट्यांतील २५० पेक्षा अधिक रहिवासी सहभागी झाले होते. बैठकीला महावितरणकडून सांगवी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एन. के सूर्यवंशी आणि सहायक अभियंता प्रकाश नाईकवाडे हे उपस्थित होते. वेदान्त, आयकॉन ग्रीन, गोल्ड फिंगर या खंडित वीजपुरवठ्याची झळ बसलेल्या सोसायट्यामध्ये तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. या व्यतिरिक्त विद्युतपुरवठ्यातील समस्यांविषयी अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विद्युतपुरवठा वारंवार खंडित होणे, खंडित पुरवठा कमी दाबाने पुन:स्थापित झाल्याने घरातील टीव्ही, फ्रीज, संगणक आदी मौल्यवान उपकरणांचे नुकसान होणे. लिफ्ट बंद पडणे, पाणीपुरवठा न होणे, मोबाइल चार्जिंग न होणे, गिझर, फ्रीज न चालणे अशा समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे नमूद केले. याशिवाय परिसरात अनेक डीपीला झाकणे नाहीत, विजेची वाढीव बिले व त्याचे तत्काळ निराकरण होत नाही अशा समस्या नागरिकांनी मांडल्या. येथील वीजपुरवठा यंत्रणा खूप जुनी असल्याने तिची देखभाल आणि नियंत्रण अत्यंत जिकीरीचे झाले आहे. या ठिकाणी काम करताना महावितरण कर्मचाऱ्यांचे प्रसंगी प्राण धोक्यात येण्याचीही शक्यता असते. येथील पुरवठा हिंजवडी आणि जगताप डेअरी येथील केवळ वाहिन्यावरून गेली कित्येक वर्षांपासून होत आहे. या कालावधीत ग्राहकांचे संख्येत प्रचंड वाढ झाल्याने व्यवस्थेवर ताण येत आहे. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आर्द्रतेमुळे पुरवठ्यावर परिणाम होऊन नेमक्या कोणत्या ठिकाणी आर्द्रता निर्माण झाली आहे हे शोधणे अवघड जात आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाला विलंब होतो असे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले. सलग दोन दिवस बत्ती गुल असल्याने रहिवाशांची घालमेल सुरु असल्याने शिवसेनेचे शहरप्रमुख आणि स्थानिक नगरसेवक राहुल कलाटे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला आहे. महावितरणच्या सातत्याने अनेक चुका सुरूच असल्याने गैरसोय सुरु आहे. लवकर तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.