शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांची ठेकेदारी

By admin | Updated: April 30, 2017 05:12 IST

महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्या निकटवर्तीयांची ठेकेदारी जोरात सुरू आहे. महापालिकेतील संबंधित विभागाचा अधिकारी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या

पिंपरी : महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्या निकटवर्तीयांची ठेकेदारी जोरात सुरू आहे. महापालिकेतील संबंधित विभागाचा अधिकारी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या निकटवर्तीयांना कामाचा ठेका मिळवून देतात. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात अधिकारी, कर्मचाऱ्यांची भागीदारी असते. भ्रष्टाचारातून मिळणाऱ्या रकमेपेक्षा भागीदारीतील ठेकेदारीतून अधिकारी, कर्मचाऱ्यांना बक्कळ कमाई होत आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कारवाईत आठवड्यात दोन अधिकारी सापडले असले तरी ठेकेदारीतील भागीदारीकडे व विकास कामांच्या गुणवत्तेकडे राजकीय पदाधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या वशिलेबाजीने अनेक कार्यकर्त्यांनी महापालिकेत नोकरी मिळवली आहे. शिवाय या नेत्यांच्या मर्जीत राहून पदोन्नतीने अधिकारीपदापर्यंत पोहोचलेले अनेक जण ठेकेदारीत गुंतले आहेत. महापालिकेच्या नालासफाईच्या कामापासून ते विविध प्रकारच्या कामासाठी आपल्या ओळखीतल्या, निकटवर्तीय लोकांना काम मिळवून देण्यात अशा अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. कामाचा ठेका मिळवून दिल्यानंतर त्यातील विशिष्ट रकमेची टक्केवारी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याच्या खिशात पडते. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकू नये, याची दक्षता म्हणून महापालिकेतील काही अधिकाऱ्यानी एजंट नेमले आहेत. एका अधिकाऱ्याने तर त्यासाठी एक महिला नेमली आहे. ही महिला प्रत्यक्ष महापालिकेत कायम स्वरूपी, अथवा मानधन तत्त्वावर नेमणुकीस नसली तरी तिचा महापालिकेत कायम वावर आहे. जनजागृतीसंबंधीची कामे त्या महिलेमार्फत दिली जातात. हा प्रकार भाजपातील पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येऊ लागला आहे. (प्रतिनिधी)अनेक संस्थांत अधिकाऱ्यांचे हितसंबंध शहरातील मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम एका संस्थेला दिले. त्याचा पोलखोल स्थायी समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सीमा सावळे यांनी मागील बैठकीत केला. ही संस्था महापालिकेतील एका अधिकाऱ्याच्या निकटवर्तीयाची असल्याचे निदर्शनास आले. महापालिकेच्या विविध उपक्रमांची जनजागृती करण्यासाठी पथनाट्य करणाऱ्या संस्था नेमल्या. त्यात काही अधिकाऱ्यांचे हितसंबंध असल्याचे दिसून आले आहे.

‘जाऊ तिथे खाऊ’चे धोरण आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या तोंडावर गत वर्षी सोशल मीडियावर संत तुकाराम महाराजांचे अभंग प्रसारित करण्याची सुपिक कल्पना महापालिकेतील एका अधिकाऱ्याच्या डोक्यातून आली होती. स्थायी समितीची विषयपत्रिका तयार करण्यापासून ते स्थायी समितीत होणाऱ्या चर्चेवेळी उपस्थित राहाण्याची संधी मिळालेल्या या अधिकाऱ्याने लाखोंचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केला होता. विषयपत्रिकेवर या एका ठिकाणी अक्षरी पन्नास लाख तर अंकी पाच लाख असा उल्लेख करून सर्वांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला होता. पत्रकारांच्या दक्षतेमुळे त्यांचा पाच लाखांच्या प्रस्तावात ५० लाख लाटण्याचा डाव फसला. महापालिकेच्या कार्यक़्रमासाठी मंडप उभारणीचा ठेकेदार ते त्या ठिकाणी व्हिडिओ चित्रिकरणाठी नेमण्यात येणाऱ्या संस्था आपल्याच मर्जीतल्या अशा पद्धतीने ‘जाऊ तिथे खाऊ’ असे धोरण अवलंबणारे अधिकारी महापालिकेत आहेत. त्यांच्यावर महापालिकेतील आजी माजी पदाधिकारी व आयुक्तांचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.

नगरसेवक-अधिकाऱ्यांचे साठेलोटे अनेक नगरसेवकांनी आपल्या जवळच्या नातेवाइकांच्या नावे महापालिकेत ठेका मिळविला आहे. नगरसेवक अथवा महापालिका अस्थापनात काम करणारी अधिकारी, कर्मचारी यांना अशा प्रकारे महापालिकेच्या विकासकामांचा ठेका घेता येत नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या काळापासून अधिकारी आणि नगरसेवकांचे साटेलाटे असल्याने हा प्रकार बिनबोभाट सुरू आहे.