शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आता आश्वासनांचे राजकारण संपले

By admin | Updated: February 14, 2017 02:02 IST

मागील पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांना सत्ताधाऱ्यांनी अनेक आश्वासने दिली. मात्र त्याचे काय झाले, यावर बोलणार नाही. मतदारराजा सुजाण

भोसरी : मागील पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांना सत्ताधाऱ्यांनी अनेक आश्वासने दिली. मात्र त्याचे काय झाले, यावर बोलणार नाही. मतदारराजा सुजाण झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आश्वासनांवर मतदान होणार नाही, तर योग्य उमेदवारालाच मतदान होईल, असा विश्वास भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.प्रभाग क्रमांक तीनमधील भाजपाचे उमेदवार नितीन अप्पा काळजे, सुवर्णा विकास बुर्डे, लक्ष्मण सोपान सस्ते यांच्या प्रचारासाठी आमदार लांडगे यांच्या उपस्थितीत डुडुळगाव येथील अडभंगनाथ मंदिरासमोर सभा झाली. या वेळी आमदार लांडगे बोलत होते. डुडुळगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार लांडगे म्हणाले, ‘‘विधानसभेच्या निवडणुकीत डुडुळगावातील गावकऱ्यांनी पाठिंबा दिला होता. मला ८४ टक्के मतदान झाले होते. अपक्ष असताना मला याच गावकऱ्यांनी साथ दिली आहे. आता भाजपाच्या माध्यमातून भोसरी मतदारसंघात चांगले काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये आपल्या विचारांचेच नगरसेवक निवडून यावेत. नागरिकांना अडचणीतून बाहेर काढतील अशाच उमेदवारांची निवड केली आहे. आपली साथ हवी. ग्रामस्थांना वाटते की, माझे डुडुळगावाकडे लक्ष नाही. मात्र २०१४ नंतर माझे सर्वांत जास्त लक्ष या गावांकडेच आहे. या गावाचा विकास करण्यासाठीच सक्षम आणि आपल्या विचारांच्या उमेदवारांना उभे केले आहे. आपल्या गावाच्या विकासासाठी नक्कीच या उमेदवारांना ग्रामस्थ साथ देतील. मागील पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवक नितीन काळजे यांनी चऱ्होलीचा मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. त्याचप्रमाणे या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये जोडलेल्या गावांचा विकास करण्याची संधी या उमेदवारांना द्यावी.’’(वार्ताहर)