शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणची प्रलंबित कामे पूर्ण करण्याची सूचना; भोसरीत आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 15:20 IST

भोसरी विधानसभा मतदार संघातील महावितरणशी संबंधित सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार महेश लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

ठळक मुद्देभोसरीत पार पडली भोसरी विधानसभा विद्युत समितीची पहिलीच आढावा बैठकसमितीच्या सदस्यांच्या भागातील तक्रारींचा घेण्यात आला आढावा

पिंपरी : भोसरी विधानसभा मतदार संघातील महावितरणशी संबंधित सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार महेश लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच नवीन ग्राहकांना वीज मीटर लवकरात-लवकर उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशा सूचना देखील केल्या. भोसरी विधानसभा विद्युत समितीची पहिलीच आढावा बैठक भोसरीत पार पडली. आमदार व समितीचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला महावितरणचे कार्यकारी अभियंता तथा समितीचे सह अध्यक्ष मदन शेवाळे, नगरसेवक व समितीचे सदस्य राहुल जाधव, कुंदन गायकवाड, राजेंद्र लांडगे, विकास डोळस, सागर गवळी, उत्तम केंदळे, नगरसेविका व सदस्या  सारिका बोऱ्हाडे, सोनाली गव्हाणे, अश्विनी बोबडे, सुवर्णा बुर्डे, उपविभागीय अभियंता बापूराव भरणे, ग्राहक प्रतिनिधी मच्छिंद्र दरवडे, परिक्षित वाघेरे, निलेश भालेकर, राहुल शिंदे, सम्राट भागवत, अशासकीय प्रतिनिधी सुहास ताम्हाणे बैठकीला उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीमध्ये येत्या २०१८-१९मध्ये घेण्यात येणाऱ्या कामाचा आराखडा तयार करणे. भोसरी मतदार संघातील विद्युत विभागाशी नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडविणे. नवीन ग्राहकांना वीज मीटर लवकरात-लवकर उपलब्ध करुन देणे. महावितरणच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणे. नवीन प्रस्ताव तत्काळ मंजुर करुन घेऊन कामे सुरु करावेत, अशा सूचना आमदार लांडगे यांनी केल्या आहेत. समितीच्या सदस्यांच्या भागातील तक्रारींचा आढावा घेण्यात आला. तसेच पूर्ण झालेली कामे व प्रस्तावित कामांचा यासह इतर प्रलंबित विषयांबाबत आमदाल लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आला. 

विविध योजनांतील पूर्ण झालेली, प्रगतीपथावर असलेली व प्रस्थापित कामे :भोसरी विभागांतर्गत आकुर्डी, भोसरी व प्राधिकरण हे तीन उपविभाग असून या तीन उपविभागात संभाजीनगर, चिंचवड, मोशी, भोसरी, नाशिक रोड, चऱ्होली, निगडी, प्राधिकरण, देहूरोड, देहूगाव आणि तळवडे अशा नऊ शाखा कार्यालयेत आहेत. भोसरी विभागात सध्या ५३८ उच्चदाब, दोन लाख ११ हजार ७५१ घरगुती, २३हजार ७२३ व्यापारी, ११ हजार ४७७ औद्योगिक, १ हजार ६४९ शेती व १ हजार २१२ इतर असे एकूण दोन लाख ४९ हजार ८१२ वीज ग्राहक आहेत. या सर्व वीज ग्राहकांना चिंचवड, भोसरी-१, भोसरी २ आणि टेल्को अति उच्च दाब उपकेंद्राद्वारे वीजपुरवठा करण्यात येत आहे. विविध योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामामुळे वीज हानी कमी होऊन वीज ग्राहकांना सुरळीत व योग्य दाबाने वीज पुरवठा करणे, तसेच नवीन येणाऱ्यांना वीज पुरवठा देणे शक्य झाले आहे. डीपीडीसी योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे अजून वीज गळती कमी होऊन योग्य दाबाने वीजपुरवठा करणे. नवीन मागणी असलेल्या वीज ग्राहकांना वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे, असे आमदार लांडगे यांनी सांगितले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणakurdiआकुर्डीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड