शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अधिकृत बांधकामांना नो एन्ट्री, ‘स्थायी’चा चिंचवड मतदारसंघासाठी निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 03:10 IST

पावसाचे प्रमाण कमी असल्याचे कारण देत शहरातील केवळ चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नवीन गृहप्रकल्पांना काही काळ परवानगी देऊ नये, असा अजब निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

पिंपरी  - पावसाचे प्रमाण कमी असल्याचे कारण देत शहरातील केवळ चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नवीन गृहप्रकल्पांना काही काळ परवानगी देऊ नये, असा अजब निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. महापालिकेच्या उत्पन्नाला त्याचा आर्थिक फटका बसणार असून, स्थानिक आमदारांच्या सूचनेनुसार निर्णय घेण्यात आल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच भागात अनधिकृत बांधकामे राजरोसपणे सुरू असताना रीतसर परवानगी घेणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना अडचणीत आणणाºया निर्णयाविषयी उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. शहरातील प्रगतिशील भाग म्हणून पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, ताथवडे, रावेत, वाकड, पुनावळे, मामुर्डी, किवळे परिसर ओळखला जातो. या ठिकाणी रीतसर परवानगी घेण्यास अटकाव करण्याच्या निर्णयाने अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच शहरातील पिंपरी व भोसरी मतदारसंघात ही बंदी नसल्याने महापालिका प्रशासन चिंचवड मतदार संघापुरते अंमलबजावणी करणार का, या विषयी उत्सुकता आहे.गेल्या आर्थिक वर्षात १ हजार ७०० हून अधिक बांधकामांना महापालिकेने परवानगी दिली. त्यातून बांधकाम परवाना विभागाला ३९९ कोटींचा महसूल मिळाला. राज्य सरकारने ह्यरेराह्ण (रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट अ‍ॅक्ट) हा नवीन कायदा १ मेपासून लागू केला. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांकडून अधिकाधिक महसूल महापालिकेला मिळाला आहे. परंतु, नवीन निर्णयाने उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता आहे.धोरणाशी विसंगत निर्णय१केंद्र व राज्य शासनाने हक्काचे घर देण्याची योजना सुरू केली आहे. त्यासाठी अनधिकृत बांधकामांऐवजी अधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र, महापालिका स्थायी समितीने शासनाशी विसंगत निर्णय घेतला आहे. पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, ताथवडे, रावेत, वाकड, पुनावळे, मामुर्डी, किवळे आदी भागामध्ये लोकसंख्या वाढत आहे. त्याठिकाणी गृहप्रकल्प व सदनिकांना मागणी वाढत आहे.गृहप्रकल्पांचा सुविधांवर ताण२ चिंचवड मतदारसंघातील वाढत्या गृहप्रकल्पांमुळे नागरी समस्यांमध्ये भर पडत आहे. विशेषत: पाणीटंचाईच्या काळात मूलभूत सुविधांवर ताण येत असल्याचा दावा भाजपाचे महापालिकेतील पदाधिकारी करीत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचा दावा स्थायी समितीतील भाजपाच्या सदस्यांनी केला आहे. या ठरावावर सूचक म्हणून विलास मडिगेरी यांची, तर अनुमोदक म्हणून सागर आंगोळकर यांची स्वाक्षरी आहे. विलास मडिगेरी म्हणाले, ‘‘पावसाळा सुरू झाला असला, तरी पावसाचे प्रमाण व धरणातील पाणीसाठा विचारात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या