शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नव्वद कोटींचा भ्रष्टाचार, शिवसेना खासदारांचा आरोप, निविदेतील रिंगमधून भाजपा नेत्यांकडून पालिकेची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 04:38 IST

‘ना भय, ना भ्रष्टाचार ’असे आश्वासन देऊन महापालिकेत सत्ता मिळविली, तेच भाजपा नेते भ्रष्टाचार करून महापालिकेची लूट करू लागले आहेत, असा थेट आरोप शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व श्रीरंग बारणे यांनी केला.

पिंपरी : ‘ना भय, ना भ्रष्टाचार ’असे आश्वासन देऊन महापालिकेत सत्ता मिळविली, तेच भाजपा नेते भ्रष्टाचार करून महापालिकेची लूट करू लागले आहेत, असा थेट आरोप शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व श्रीरंग बारणे यांनी केला. ३२५ कोटींच्या कामात ठेकेदारांची रिंग करून ९० कोटींचा भ्रष्टाचार झाला असून, याप्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.पुणे महापालिकेच्या निविदाप्रक्रियेत असाच भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले. त्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निविदा रद्द करण्यास सांगितले. असाच निर्णय मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवडमधील भाजपा नेत्यांनी केलेल्या निविदा रिंग प्रकरणात घेतील, अशी अपेक्षा आहे. सात डिसेंबरला १२ ठरावीक ठेकेदारांना रिंग करून ४२५ कोटींचे काम दिले आहे. महापालिकेत यापूर्वीही हेच ठेकेदार १५ ते २५ टक्के कमी दराने काम करत होते. तेच ठेकेदार या वेळी ८ ते ९ टक्के जादा दराने निविदा भरून काम करायला पुढे आले आहेत. २५ टक्क्यांचा फरक व गफला सरळ दिसून येत आहे, असा आरोप आढळराव पाटील यांनी केला.ते म्हणाले, देशातील भ्रष्टाचाराच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाºयांच्या भ्रष्टाचाराचा वेग अधिक आहे. ठेकेदारांनी रिंग करून महापालिकेचे कोट्यवधीचे नुकसान केले आहे. त्यातून भाजपाचे पदाधिकारी, महापालिका आयुक्त आणि काही लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने महापालिकेला लुटण्याचे काम सुरू आहे. एका वर्षात २५० कोटींना चुना लावला, आणखी चार वर्षात किती भ्रष्टाचार होणार आहे.पुणे, मुंबई, सोलापूर या महापालिकांपेक्षा मोठ्या प्रमाणावर पिंपरी चिंचवडमध्ये भ्रष्टाचार आहे. महापालिकेतील रस्त्याच्या कामांची निविदा प्रक्रिया थांबवून दोषींवर कारवाई करावी. मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याकडे चौकशीची मागणी करणार आहे. त्यांनी दखल न घेतल्यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करणार आहे. या आगोदर भोसरी शीतलबाग पुलाच्या भ्रष्टाचाराबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आहे.भ्रष्टाचार अन् दहशत सुरूमहापालिकेत राष्टÑवादी काँग्रेसच्या सत्ता काळात विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची आरोळी उठविणारेच भाजपाचे पदाधिकारीच भ्रष्टाचार करू लागले आहेत. या भ्रष्टाचारास प्रशासनसुद्धा तेवढेच जबाबदार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधाºयांकडून लूट होत आहे. सत्तेत बसलेलेच भ्रष्टाचार करीत आहेत. सत्ताधाºयांनी शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करून लूट चालवली आहे, असा आरोप खासदार बारणे यांनी केला.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड