शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

शहरात नाइटलाइफची धूम

By admin | Updated: July 26, 2016 05:14 IST

महानगरांमध्ये दुकाने, मॉल, चित्रपटगृह २४ तास सुरू ठेवण्यासंबंधीचा कायदा करण्याच्या तयारीत केंद्र शासन आहे. परदेशात ज्याप्रमाणे दिवस-रात्र दुकाने, मॉल सुरू राहतात, त्याप्रमाणे

- संजय माने,  पिंपरी

महानगरांमध्ये दुकाने, मॉल, चित्रपटगृह २४ तास सुरू ठेवण्यासंबंधीचा कायदा करण्याच्या तयारीत केंद्र शासन आहे. परदेशात ज्याप्रमाणे दिवस-रात्र दुकाने, मॉल सुरू राहतात, त्याप्रमाणे मुंबईसारख्या महानगरांमध्ये नाइटलाइफचा अनुभव घेता येणार आहे. हिंजवडी आयटी पार्कमुळे विकसित झालेल्या हिंजवडी, वाकड, पिंपळे सौदागर परिसरात केंद्राचा नवा कायदा अस्तित्वात येण्याची वाट न पाहताच नाइटलाइफची धूम अनेक जण अनुभवत आहेत. परदेशात जपान, तसेच थायलंडमध्ये ‘सेव्हन इलेव्हन’ नावाने असलेली दुकाने रात्रभर सुरू असतात. ३६५ दिवस ही दुकाने २४ तास खुली असतात. विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, शीतपेय,कॉस्मेटिक्स व अन्य दैनंदिन गरजेच्या वस्तू हव्या त्या वेळी खरेदी करता येतात. त्या ठिकाणी जवळच एटीएम केंद्र असते. वायफाय सुविधा उपलब्ध असते. अशाच प्रकारे भारतातील महानगरांमध्येही दुकाने, मॉल, चित्रपटगृह रात्रभर सुरू राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना शहरातील पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी या भागात सद्य:स्थितीतही रात्रभर व्यवहार सुरू असल्याचे पाहावयास मिळते. वाकड मधील हुक्काबार रात्रभर सुरू असतात. पिंपळे सौदागरला पानटपऱ्या, तसेच काही हॉटेलांमध्ये रात्री कधीही हवे ते खाद्यपदार्थ खाण्यास मिळतात. हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांतून सुटल्यानंतर रात्री दीड, दोन, तीनलाही नाष्टा हाऊसवर सामोसा खाण्यासाठी तरुणाईची गर्दी दिसते. रात्री दुकानांच्या रोषणाईच्या झगमगाटात सिगारेटचे झुरके मारणारी तरुणाई पाहावयास मिळते. परदेशात सेव्हन इलेव्हन शॉपींमध्ये दैनंदिन आवश्यक अशा सर्व वस्तू मिळतात. महाराष्ट्रातील एखाद्या खेड्यातून कोणी या भागात नव्याने आले, तर त्याला जणू काही परदेशात आल्याचा भास होतो. आलिशान इमारती, रात्र झाली हे कळूनही येणार नाही, असा झगमगाट, हॉटेलांच्या आवारात मध्यरात्री दिसून येणारी गर्दी अशी परिस्थिती पिंपरी-चिंववडच्या काही भागात आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर आयटी क्षेत्रात काम करणारे अभियंते व अन्य कामगार वर्ग आहे. त्यामुळे उच्चभ्रू वस्तीचा परिसर म्हणून गणल्या गेलेल्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची जीवनशैलीही तशीच आहे. आयटी कंपन्यांच्या मार्फत कामानिमित्त परदेशात विविध ठिकाणचे दौरे करून आलेल्या आयटीयन्सच्या जीवनशैलीत आणि येथील रहिवाशांच्या तुलनेत कमालीचा फरक आहे. खेड्याचे महानगरात रूपांतर झालेल्या या परिसराचा आमूलाग्र कायापालट झाला आहे.हिंजवडी, वाकड, पिंपळे सौदागर परिसरात नाइटलाइफचा सद्य:स्थितीतही अनुभव घेता येत असला, तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने मात्र कोणतीच दक्षता घेतलेली नाही. शहराच्या अन्य भागांत ११ नंतर कोठेही दुकाने, पानटपऱ्या सुरू असल्याच्या दिसून येत नाहीत. एवढेच नव्हे तर रेल्वेस्थानक, बसथांबे या परिसरातही रात्री दुकाने सुरू नसतात. वाकड, हिंजवडी आणि पिंपळे सौदागर हा परिसर मात्र त्यास अपवाद राहिला आहे. या भागात गुन्हेगारी घटनांचे प्रमाणही अधिक आहे.