शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आमदारपुत्राच्या प्रतापाने अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 02:31 IST

कासारवाडीतील उड्डाणपुलावर मित्र-मैत्रिणींबरोबर मध्यरात्री एकच्या सुमारास वाढदिवस साजरा करणाऱ्या आमदारपुत्राला हटकणा-या पोलीस अधिकारी महिलेला कारवाईस सामोरे जावे लागले आहे.

पिंपरी : कासारवाडीतील उड्डाणपुलावर मित्र-मैत्रिणींबरोबर मध्यरात्री एकच्या सुमारास वाढदिवस साजरा करणाऱ्या आमदारपुत्राला हटकणा-या पोलीस अधिकारी महिलेला कारवाईस सामोरे जावे लागले आहे. आमदारांच्या तक्रारीवरून वरिष्ठांनी पोलीस उपनिरीक्षक महिलेला नोटीस बजावली. त्यानंतर खातेनिहाय चौकशी झाली. या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर पोलीस अधिकारी महिलेवर खात्यांतर्गत कारवाईचा निर्णय शनिवारी झाला. त्याचबरोबर यापुढे लोकप्रतिनिधी अथवा त्यांचे नातेवाईक यांच्याशी उद्धट वर्तन करू नये, अशी सक्त ताकीदही देण्यात आली. दरम्यान, लोकप्रतिनिधींच्या तक्रारीवरून पोलीस अधिकाºयांना अशा मानहानीकारक कारवाईला सामोरे जावे लागत असल्याने त्यांचे मनोधैर्य खच्ची होत असल्याची चर्चा शहरात आहे.शिवसेनेचे पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचे चिरंजीव मित्र-मैत्रिणींना बरोबर घेऊन कासारवाडीतील उड्डाणपुलावर वाढदिवस साजरा करीत होते. काही जण फटाके फोडण्याच्या तयारीत होते. मध्यरात्री एकच्या सुमारास भररस्त्यात जल्लोषात वाढदिवस साजरा करण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरू होता. पोलीस उपनिरीक्षक रुपाली पाटील यांच्या ही बाब निदर्शनास आली असता, त्यांनी ग्रुपला हटकले. रात्रीच्या वेळी सार्वजनिक शांततेचा भंग होईल, असे काही करू नका, असे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या वेळी आमदारपुत्राने ‘मी आमदारांचा मुलगा आहे. तुम्ही आम्हाला येथे वाढदिवस साजरा करण्यास मज्जाव करू शकत नाहीत’ असे पाटील यांनाच दटावले. पोलिसांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत कोणीही नव्हते. पालकांशी संपर्क साधून ‘पोलीस ठाण्यात भेटा’ असा निरोपही दिला. मात्र, या घटनेनंतर आमदार चाबुकस्वार यांनी थेट पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे पाटील यांची तक्रारकेली. तसेच मुलाच्या कानफटात मारली, असाही आरोप केला. २१ आॅक्टोबर २०१७ ला घडलेल्या या घटनेसंबंधी आलेल्या तक्रारीची पोलीस आयुक्त शुक्ला यांनी गंभीर दखल घेतली. तसेच पाटील यांच्यावर कारवाई केली आहे. अशा कारवाईमुळे पोलीस अधिकारी, कर्मचाºयांचे मनोबल खच्ची होते, अशी खंत व्यक्त होत आहे.लोकप्रतिनिधींकडून अधिकाराचा गैरवापर होत असल्याबद्दलही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.कासारवाडी येथे आॅक्टोबर २०१७ मध्ये मुलाला वाढदिवस साजरा करताना, पोलीस अधिकारी महिलेने हटकले. उद्धट वर्तन केले. याबाबत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे पोलीस अधिकारी महिलेची तक्रार केली होती. किरकोळ प्रकार असल्याने त्याकडे नंतर दुर्लक्ष केले. याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर पुढे काय झाले, याबद्दल माहिती नाही. त्यामुळे आता काही सांगता येणार नाही. - गौतम चाबुकस्वार, आमदार

टॅग्स :Politicsराजकारणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड