शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवजात बाळांची खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; वाकड पोलिसांनी सहा महिलांना ठोकल्या बेड्या

By नारायण बडगुजर | Updated: April 13, 2024 21:17 IST

वाकड पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील हवालदार वंदू गिरे यांनी याबाबत शुक्रवारी (दि. १२) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पिंपरी : नवजात बाळांची खरेदी विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. वाकड पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने या टोळीचा पर्दाफाश करून सहा महिलांना अटक केली. त्यांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि. १६) पोलिस कोठडी सुनावली.  

वाकड पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील हवालदार वंदू गिरे यांनी याबाबत शुक्रवारी (दि. १२) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलिस आयुक्त डाॅ. विशाल हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस हवालदार वंदू गिरे यांना शुक्रवारी (दि. १२) माहिती मिळाली की, काही महिला या नवजात बालकाची विक्री (तस्करी) करण्यासाठी वाकड येथील जगताप डेअरी परिसरात येणार आहेत. त्यानुसार वाकडच्या तपास पथकाने सापळा रचून कारवाई केली. त्यावेळी शुक्रवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास दोन रिक्षांधून काही महिला आल्या. त्यांच्याबाबत संशय आल्याने दोन्ही रिक्षांमधील सहा महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील नवजात बालकाबाबत विचारणा केली. सहा महिलांनी मिळून त्यांच्यातीलच एका महिलेचे सात दिवसांचे नवजात बालक पाच लाख रुपयांना विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली.

अटक केलेल्या संशयित महिला अतिशय सराईत असल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे कौशल्यपूर्व तपास केला. त्यांनी यापूर्वी साथीदारांच्या मदतीने अशाचप्रकारचे लाखो रुपयांसाठी नवजात पाच बालकांची तस्करी केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. 

वाकड पोलिस ठाण्याच्या तपास पथकाचे उपनिरीक्षक सचिन चव्हाण, अनिरुध्द सावर्डे, श्रेणी उपनिरीक्षक बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, सहायक फौजदार राजेंद्र काळे, पोलिस अंमलदार वंदु गिरे, रेखा धोत्रे, जयश्री वाखारे, ज्योती तुपसुंदर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

परिचारिकेचा सहभाग

टोळीमध्ये एका परिचारिकेचा सहभाग आहे. ती एका खासगी रुग्णालयात नोकरीला असल्याचे तपासात समोर आले आहे. वंध्यत्वाची समस्या असलेले काही दाम्पत्य रुग्णालयात यायचे. याबाबत परिचारिका टोळीतील इतर महिलांना माहिती द्यायची. महिला दाम्पत्याशी संपर्क साधून त्यातील गरजू दाम्पत्यांना पाच ते सात लाख रुपयांमध्ये बाळाची विक्री करायच्या.  

गरीब आईवडिलांकडून खरेदी

दोन किंवा जास्त अपत्ये असलेल्या गरीब, गरजू दाम्पत्याला काही रक्कम देऊन त्यांचे नवजात बाळ खरेदी करायचे. त्यानंतर या बाळाची विक्री या टोळीतील महिलांकडून केली जात होती.  त्यासाठी रोख स्वरुपात रकमेची देवाणघेवाण होत असल्याचे तपासात समोर आले.

व्हाटसअपवर चॅटिंग 

टोळीतील महिला संपर्कासाठी व्हाटसअपचा वापर करायच्या. गेल्या एक ते दीड वर्षांपासून ही टोळी सक्रीय असून, पिंपरी-चिंचवड, पुणे शहरामध्ये त्यांनी नवजात बाळांची खरेदी विक्री केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांच्यासोबत आणखी कोणी साथीदार आहेत का, त्यांनी आणखी कुठे बाळांची तस्करी केली आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.