शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उपसभापतिपदी नेवाळे बिनविरोध

By admin | Updated: May 10, 2016 00:37 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या उपसभापतिपदी विष्णुपंत नेवाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिक्षण मंडळाचे उपसभापती नाना शिवले यांनी मुदत पूर्ण झाल्याने राजीनामा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या उपसभापतिपदी विष्णुपंत नेवाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.शिक्षण मंडळाचे उपसभापती नाना शिवले यांनी मुदत पूर्ण झाल्याने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक जाहीर केली होती. महापालिकांतील शिक्षण मंडळे २०१७नंतर बरखास्त होणार आहेत. सभापती आणि उपसभापतिपदी सर्वांना संधी मिळावी, यासाठी सहा महिने कालखंड ठरविण्यात आला होता. त्यानुसार उपसभापती शिवले यांचा कालखंड संपल्याने सभापती चेतन भुजबळ यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. या पदासाठी काँग्रेसचे सदस्य विष्णुपंत नेवाळे, राष्ट्रवादीचे सदस्य शिरीष जाधव यांच्या नावाची चर्चा होती. दरम्यान, आज सभापती चेतन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. या वेळी शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर उपस्थित होते. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या मुदतीत नेवाळे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. नामनिर्देशन पत्राची छाननी केल्यानंतर अर्ज वैध झाल्याचे सभापतींनी जाहीर केले. उपसभापतिपदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने नेवाळे यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. या वेळी माजी सभापती चेतन घुले, फजल शेख, विजय लोखंडे, माजी उपसभापती नाना शिवले, धनंजय भालेकर, श्याम आगरवाल, सविता खुळे, लता ओव्हाळ, सदस्य निवृत्ती शिंदे, शिरीष जाधव, तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे आदी उपस्थित होते. या वेळी नेवाळे यांचा सत्कार करण्यात आला. उपसभापतिपदी काँग्रेसला संधीपक्षनेत्या मंगला कदम म्हणाल्या, ‘‘शिक्षण मंडळातील सभापती आणि उपसभापती पदांवर सर्व सदस्यांना संधी मिळावी, असा आमचा प्रयत्न होता. या समितीत काँग्रेसचे श्याम आगरवाल आणि विष्णुपंत नेवाळे असे दोन सदस्य होते. आगरवाल यांना यापूर्वीच संधी मिळाल्याने नेवाळे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. अजित पवार यांच्या सूचनेनुसारच उपसभापतिपदासाठी नाव सुचविले होते.’’ (प्रतिनिधी)