शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या आरोग्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, कचराकुंड्या ही शहरातील मुख्य समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 01:56 IST

महापालिकेच्या नियोजनशून्य कामामुळे ओसंडून वाहणा-या कचराकुंड्या ही शहरातील मुख्य समस्या झाली आहे. याच बेजबाबदार नियोजनामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून, या कचराकुंड्यामधून अनेकांनी आरोग्य धोक्यात घालून पोटाची खळगी भरण्याचा मार्ग निवडला आहे.

चिंचवड : महापालिकेच्या नियोजनशून्य कामामुळे ओसंडून वाहणा-या कचराकुंड्या ही शहरातील मुख्य समस्या झाली आहे. याच बेजबाबदार नियोजनामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून, या कचराकुंड्यामधून अनेकांनी आरोग्य धोक्यात घालून पोटाची खळगी भरण्याचा मार्ग निवडला आहे.शहरात भरभरून वाहणा-या कचराकुंड्यांचे वास्तव समोर येत आहे. याच कुंड्या अनेकांचा आधार ठरत आहे. बहुतांश मुले व महिला अशा ठिकाणी कचरा वेचताना दिसत आहेत. ना दप्तराचे ओझे ना शाळेचा गंध, मळकटलेले कपडे आणि भिरभिरती नजर या अवस्थेत अनेक लहान मुले अशा कचराकुंड्यांतून उपजीविका भागवीत आहेत.अनेक महिलाही या कामात व्यस्त आहेत. कचरा गोळा करण्यासाठी कोणतीही सुरक्षिततेची साधने नसतानाही अनेक कर्मचारी आरोग्याचा धोका पत्करून ही कामे करीत आहेत. विविध भागातील कचरा गोळा करून एका ठरावीक जागेवर टाकला जातो. या ठिकाणी अनेक महिला हा कचरा वेचण्याचे काम करतात. यातून मिळणारे भंगार, प्लॅस्टिक व अन्य वस्तू निवडण्याचे काम सुरू असते. अशा ठिकाणी घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी असूनही जीव धोक्यात घालून ही मंडळी कामात व्यस्त असतात.शहरातील डेंगी, स्वाइन फ्लू अशा धोकादायक आजारांचे थैमान सुरू असताना कचरा वेचणाºया घटकाला मात्र आपल्या जिवाची काळजी वाटत नाही. पालिका प्रशासनाचे अशा घटनांकडे दुर्लक्ष झाल्याने परिस्थिती धोकादायक आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड