शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अंधारात चाचपडणाऱ्यांना माणुसकीच्या उजेडाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 04:08 IST

एका अंध जोडप्याने आधारासाठी लग्नगाठ बांधली. सुखाचा संसार सुरू झाला. मात्र नियतीची दृष्ट लागली. कुकरचे झाकण उडून झालेल्या अपघातात ती गंभीर भाजली

चिंचवड : एका अंध जोडप्याने आधारासाठी लग्नगाठ बांधली. सुखाचा संसार सुरू झाला. मात्र नियतीची दृष्ट लागली. कुकरचे झाकण उडून झालेल्या अपघातात ती गंभीर भाजली. तिच्या मदतीसाठी चिक्की विक्रीची व्यवसाय सोडून त्यालाही घरी बसावे लागले. चिक्की विक्री हा एकमेव आधार असलेल्या या अंध दाम्पत्याला आता हाता-तोंडाची मिळवणी करणे अवघड झाले आहे. दृष्टी अधू असतानाच दैवही परीक्षा घेत असल्याने या दाम्पत्याचे भवितव्य काळोखात बुडाले आहे. त्यांना मदतीचा हातभार लावण्यासाठी समाजाने पुढे येण्याची आवश्यकता आहे.निगडीतील आझाद चौकात भाड्याच्या खोलीत कांतीलाल व रुपाली पावरा या अंध दाम्पत्याने संसार थाटला आहे. डोळ्यात काळाकुट्ट अंधार असला, तरीही रुपाली उत्तम स्वयंपाक करते. नेहमीप्रमाणे ती सायंकाळी स्वयंपाक करत होती. भात शिजायला लावला तेव्हा कुकरच्या झाकणाचा अंदाज तिला आला नाही. कुकरमधील वाफ अंगावर आल्याने रुपाली या घटनेत जखमी झाली. तिच्या अंगाचा वेध या वाफेने घेतला आणि रुपाली जखमी झाली. कांतीलाल रेल्वेत चिक्की विक्रीचा व्यवसाय करतो. घरी आल्यावर त्याला ही घटना समजली. रुपालीवर निगडीतील खासगी डॉक्टरांकडे उपचार घेण्यात आले. मात्र अजूनही तिच्या वेदना कमी होत नाहीत. तिला गरज आहे रुग्णालयातील उपचारांची.या घटनेमुळे पावरा दाम्पत्य चिंतेत आहे. रुपाली जखमी झाल्याने कांतीलालचा चिक्की विक्रीचा व्यवसाय सध्या बंद आहे. घरभाडे, लाईटबिल थकले आहे.कामाचा सोशल मीडियावर गवगवापावरा परिवाराला मदत करण्यासाठी शहरातील एका सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला. महिन्याभरापूर्वी त्यांना मदत करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते, पदाधिकारी पुढे आले. दहा हजार रुपयांचा धनादेश, किराणा माल देण्यात आला. कांतीलालसाठी कंपनीत काम देणार असल्याचे जाहीर केले. त्याचे फोटोसेशनही झाले. संस्थेच्या वतीने सोशल मीडियावर केलेल्या कामाचा गवगवा करत पाठ थोपटून घेतली. समाजातील वंचित घटकाला मदत केल्याची बातमी सर्वत्र पसरविली. मात्र, दोन दिवसांनंतर कांतीलालला फोन करून धनादेश भरू नका, आम्ही पैसे रोख देतो, असे सांगण्यात आले; मात्र या संस्थेचे कोणीही पैसे देण्यासाठी आले नाही. फोन करून संपर्क साधला असता, आम्ही दोन दिवसांत येणार असल्याचे सांगितले जात आहे. रुपालीच्या उपचारासाठी पैसे मिळतील या आशेने तो रोज त्यांची वाट पाहत आहे. मात्र, आता आमची फसवणूक झाली आहे, अशी भावना दाम्पत्य व्यक्त करीत आहे.