शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी, नगराध्यक्षपदी मयूर ढोरे, भाजपाला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 01:59 IST

वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये राष्ट्रवादीने बाजी मारत मावळात सत्तेत असलेल्या भाजपाला धक्का दिला.

वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये राष्ट्रवादीने बाजी मारत मावळात सत्तेत असलेल्या भाजपाला धक्का दिला. नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीचे उमेदवार मयूर ढोरे विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत फाटाफूट होऊनही भाजपाला सत्तेपासून दूर राहावे लागले. मावळातील पंचायत समितीसह लोणावळा, तळेगाव, देहूरोड ही शहरे भाजपाच्या ताब्यात असताना वडगाव हे मुख्यालयाचे ठिकाण ताब्यातून गेल्याने हा भाजपाचा बालेकिल्ल्यात मोठा पराभव मानला जात आहे.तिकीट वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. एका गटाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे सदस्य बाबूराव वायकर, बाळासाहेब ढोरे, मंगेश ढोरे हे करीत होते. त्यांनी वडगाव-कातवी नगरविकास समिती स्थापना केली होती, तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व गणेश ढोरे, चंद्रकांत ढोरे व इतर करीत होते. त्यांनी श्री पोटोबामहाराज समितीची स्थापना केली होती. या निवडणुकीत भास्करराव (अप्पा), गणेश (अप्पा) व बाबूराव (अप्पा) या तिन्ही अप्पांनी ताकत पणाला लावली होती. अखेर बाबूरावअप्पांनी बाजी मारली.एकहाती सत्ता नसल्याने अडचणीवडगाव नगरपंचायत निवडणुकीत मतदारांनी सत्ता एकहाती कोणत्याच पक्षाकडे दिली नाही. भाजपा ७, राष्ट्रवादी काँग्रेस ७, अपक्ष २, तर मनसेचा एक उमेदवार विजयी झाला. या निकालाने उपनराध्यक्ष पदासह इतर पदांचे वाटप करण्यासाठी एकमेकांचा आधार घ्यावा लागणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे सात उमेदवार विजयी झाले, तरी ती दोन गटांची बेरीज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र असते, तर भाजपा नगसेवकांची संख्या कमी झाली असती. आगामी निवडणुकीत भाजपाला विचार करण्याची वेळ या निकालाने आणली आहे.वडगाव नगरपंचायत निकालभारतीय जनता पक्ष : ७राष्ट्रवादी आघाडी : ७अपक्ष (राष्ट्रवादी) : २मनसे : १एकूण : १७