शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
4
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
5
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
6
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
7
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
10
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
11
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
12
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
13
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
14
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
15
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
16
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
17
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
18
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
19
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
20
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे शक्तीप्रदर्शन

By admin | Updated: September 17, 2014 18:43 IST

राजकीयदृष्टया महत्वपूर्ण ठरणा:या पश्चिम महाराष्ट्रातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकून राष्ट्रवादी काँग्रेसने आपला राजकीय अजेंडा स्पष्ट केला.

कोल्हापुर: राजकीयदृष्टया महत्वपूर्ण ठरणा:या पश्चिम महाराष्ट्रातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकून राष्ट्रवादी काँग्रेसने आपला राजकीय अजेंडा स्पष्ट केला. कोल्हापुरात आयोजित केलेल्या शुभारंभी प्रचार सभेला प्रचंड गर्दी जमवून आपली ताकद दाखवून दिली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वच वक्त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या शंभर दिवसाच्या कारभारावर सडकून टीका करतानाच  आपले हुकमी बहुजनवादी कार्ड बाहेर काढले.
राष्ट्रवादीच्या प्रचार सभेसाठी गेल्या आठ दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात आली होती.  प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह  ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा (कृष्णा खोरे) मंत्री शशिकांत शिंदे आणि खासदार धनंजय महाडिक यांनी सभेचे नेटके नियोजन केले होते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवस अनेकांच्या भेटीगाठी घेऊन चांगलीच वातावरण निर्मिती केली.
छगन भुजबळ म्हणाले, शिवसेना-भाजपचे नेते जागावाटपावरून एकमेकांना नवराबायकोची उपमा देवू लागले आहेत. उद्या 144-144 असे जागावाटप झाले तर नवरा कोण व बायको कोण होणार? दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाली, परंतु त्याचा अहवाल अजून का प्रसिध्द केला जात नाही. भाजपच्या कार्यकारिणीत सहस्त्रबुध्दे, महाजन येतात मग त्यामध्ये पाशा पटेल, फुंडकर का चालत नाहीत. ओबीसी समाजाचे काम करणा:या नेत्यांना श्रीमंत देवेंद्र फडणवीस हे जर नौटंकी म्हणत असतील, तर मग मुंडे हे देखील नौटंकी करत होते असे त्यांना म्हणायचे आहे का, अशी विचारणाही भुजबळ यांनी केली. 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वात जास्त आमदार निवडून आल्यास शंभर दिवसांत कोल्हापूरचा टोल रद्द करून दाखवू अशी घोषणा केली. तर  गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दम असेल तर शिवसेनेने भाजपाची संगत सोडून दाखवावी असे आव्हान दिले. गावित-पाचपुते- घोरपडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणा:या भाजपाने त्यांच्यावर कोणते तीर्थ शिंपडल्याने ते पवित्र झाले, असा सवालही त्यांनी केला.
 
शेट्टी, खासदारकीवर लाथ मारा
तीन महिन्यात केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराने शेतकरी  देशोधडीला लागला असताना ‘स्वाभिमानी’ नेते कोठे आहेत, असा सवाल करत राजू शेट्टी यांना शेतक:यांचा जरा कळवळा असेल तर त्यांनी खासदारकी वर लाथ मारावी व बिहारमध्ये जाऊन कृषी मंत्र्याच्या दारात बसावे. गृहमंत्री म्हणून काम करत असताना ऊस आंदोलनामुळे एकही दिवाळी सुखाने खाऊ दिली नाही. बारामती ही आंदोलनाची पंढरी करणा:यांना  कांद्याची निर्यात बंदी दिसत नाही का, असा सवाल गृहमंत्री पाटील यांनी केला.
 
‘त्यांना’ काय वाटत असेल
शिवसेनेची भाजपच्या मागे फरफटत चाललेली पाहून स्वर्गीय बाळासाहेबांना वाईट वाटत असेल.  उध्दव ठाकरे भाजपा गेली उडत, असे म्हणण्याची हिंमत दाखविणार का, असा सवालही आर.आर. पाटील यांनी केला.
 
धाकल्या पवारांचा 
कक्ष ओस पडला
उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे शरद  पवारांसह एका हॉटेलवर उतरले होते. सकाळपासून थोरल्या पवार यांना भेटणा:यांची संख्या अधिक होती. धाकल्या पवारांचा कक्ष ओस पडला होता. 
 
रणशिंग फुंकले  
राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी कोल्हापुरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे सभास्थळी तुतारीची सलामी देऊन स्वागत करण्यात आले.