शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर पॅटर्नच्या ‘स्मार्ट वॉच’ एक्सप्रेसला स्थायी समिती सदस्यांनी लावला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 02:52 IST

सद्य:स्थितीचा मागविला अहवाल; चार हजार ५४४ घड्याळे थेट पद्धतीने खरेदीचा डाव

पिंपरी : स्वच्छ सर्वेक्षण अभियान स्पर्धेच्या नावाखाली आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार ५४४ स्मार्ट वॉच (घड्याळे) थेट पद्धतीने खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने तहकूब ठेवला आहे. आतापर्यंत महापालिकेत विविध योजनांसाठी नागपूर पॅटर्नचे सल्लागार व कंपनीच्या एक्सप्रेसला तात्पुरता ब्रेक लागला आहे. प्रशासनाने स्मार्ट वॉच योजना राबविण्यास शहरातील सद्य:स्थितीचा अहवाल सादर केल्याशिवाय स्थायी समिती मंजुरी देणार नसल्याची भूमिका सदस्यांनी घेतली आहे.केंद्र व राज्य शासनातर्फे स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेला मानांकन मिळण्यासाठी शहराची स्वच्छता आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी कामाच्या ठिकाणी आहेत का, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निविदेविना स्मार्ट वॉच थेट खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला होता. दरम्यान, ‘लोकमत’ने या प्रस्तावामागे नागपूर येथे अपयशी ठरलेल्या योजनेचा घाट घालण्यात आल्याचे उजेडात आणले. या घड्याळांची खरेदी मे. आयटीआय लि. (बेंगलोर) या संस्थेकडून थेट पद्धतीने केली जाणार आहे. चार वर्षांसाठी प्रतिनग २८७ रुपये या दराने ४ हजार स्मार्ट वॉच खरेदी केली जाणार आहेत. त्यासाठी दरमहा १३ लाख ४ हजार १२८ रुपये याप्रमाणे एक वर्षासाठी एकूण १ कोटी ५६ लाख ४९ हजार ५३६ असे एकूण चार वर्षांसाठी एकूण ६ कोटी २५ लाख ९८ हजार १४४ रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव आहे.थेट पद्धतीने होणारी घड्याळांची खरेदी नागपूर महापालिकेच्या धर्तीवर केली जात आहे. त्यावर विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनीही आक्षेप घेतला होता. त्यामुळे स्थायी समितीने हा प्रस्ताव तात्पुरता तहकूब ठेवला आहे. नागपूर महापालिकेत या विषयी काही तक्रारी दाखल आहेत. त्यामुळे पुढील बैठकीत योजनेच्या सद्य:स्थितीचा सविस्तर अहवाल सादर करावा. त्यानंतर योग्य असल्यास हा प्रस्ताव मंजूर केला जाईल. - विलास मडिगेरी, सदस्य, स्थायी समिती

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड