शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नामफलकावरून सत्ताधा-यांत दुफळी; चर्चा न करताच सर्वसाधारण सभेने गुंडाळले धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 04:06 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी अशा सन्माननीयांच्या नामफलकांविषयी लोकमतने स्टिंग आॅपरेशन केले होते. त्यानंतर दखल घेऊन स्थायी समितीने धोरण करण्याच्या सूचना केल्या होत्या. या धोरणावर पाणी पडले आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी अशा सन्माननीयांच्या नामफलकांविषयी लोकमतने स्टिंग आॅपरेशन केले होते. त्यानंतर दखल घेऊन स्थायी समितीने धोरण करण्याच्या सूचना केल्या होत्या. या धोरणावर पाणी पडले आहे.सत्ताधाºयांनी याबाबतचा प्रस्ताव दफ्तरी दाखल केला आहे. त्यामुळे शहरात लावण्यात आलेले नगरसेवकांचे पाच-पाच नामफलक कायम राहणार आहेत. यामुळे शहराचे विद्रूपीकरण कायम राहणार आहे. सत्ताधाºयांनी स्वत:चेच धोरण बासनात गुंडाळले आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात नगरसेवकांच्या मागणीनुसार त्यांचे निवासस्थान, कार्यालयाकडे दिशा दर्शविणारे नामफलक लावले जातात. शहरात एका नगरसेवकाचे चार ते पाच वेगवेगळे नामफलक लावले गेले आहेत. नगरसेवकांच्या कार्यालयाकडे, निवासस्थानाकडे आणि संपर्क कार्यालयाकडे, असे फलक शहराच्या चौका-चौकांत, गल्ली बोळात लावले गेले आहेत. तसेच फलकाचे रंग आणि अक्षरेही वेगवेगळी आहेत. त्याचा आकार आणि उंचीही भिन्न आहे. माजी नगरसेवक आणि पदाधिकाºयांचेही शहरात मोठ्या प्रमाणात नामफलक आहेत. यामुळे विद्रूपीकरण वाढले आहे.सन्माननीयांची चमकोगिरी असे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. याची दखल घेऊन स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी नामफलकाबाबत धोरण ठरविण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्थायी समितीने केलेल्या सूचनेनुसार नामफलकाबाबत स्वत:चे धोरण ठरविले होते.महासभेत सत्ताधाºयांमध्ये दुहीस्थायी समितीने केलेल्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने ब्रेक लावला आहे. सभेत हा प्रस्ताव मान्यतेसाठी महासभेसमोर ठेवला होता. मागील सभेत सत्ताधाºयांनी कोणतीही चर्चा न करता हा प्रस्ताव तहकूब केला होता.या प्रस्तावावर कोणतीही चर्चा न करता २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत हा प्रस्ताव सत्ताधाºयांनी दप्तरी दाखल केला. भाजपाच्या सदस्यांनी शहरात स्वत:चे नाम दिशादर्शक फलक पक्षाच्या रंगाचे उभारले आहेत. त्यामुळे पक्षात मतभेद असल्याचे दिसून येत आहे.असे होते धोरणविद्यमान आणि माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्या नावाचा त्यांच्या निवासस्थानाकडे जाणाºया मुख्य रस्त्याच्या कडेला एकच फलक लावावा. लगतच्या मागील निवडणुकीतीलच माजी नगरसेवकाचा नामफलक लावावा. फलक तीन फूट आणि दोन फूट आकाराचा असवा. त्याची जमिनीपासून उंची सात फूट असावी. फलक हिरव्या फ्लोरोसंट रंगामध्ये असावा. तसेच मजकूर पांढºया अक्षरांत मराठीमध्ये लिहावा. नावाच्या अक्षरांची उंची दहा सेंटिमीटर व इतर मजकुरांच्या अक्षरांची उंची सात सेमी इतकी असणार होती, असे धोरण तयार केले होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड