शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड योग्य पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:16 IST

उदंड प्रतिसाद : ‘लोकमत’ आणि आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडातर्फे मार्गदर्शन शिबिर

पिंपरी : जीवनातील गरजा पूर्ण करण्यासह निवृत्तीनंतर आरामदायी आयुष्य जगण्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सर्वांत योग्य पर्याय असल्याचे इच्छुक गुंतवणूकदारांनी मान्य केले. म्युच्युअल फंडात ताबडतोब गुंतवणूक करण्याचा निर्धारही सर्वांनी केला.

प्रसंग होता ‘लोकमत’ आणि आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इन्व्हेस्टमेंट मंत्र गुंतवणूकविषयक मार्गदर्शक शिबिराचा. म्युच्युअल फंडाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यास शहरवासीयांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याची प्रचिती या निमित्ताने आली. आकुर्डीतील सीझन्स बॅन्क्वेट्सच्या हॉलमध्ये रविवारी सायंकाळी हे शिबिर पार पडले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी आदित्य बिर्ला सनलाइफ एएमसी लि.चे प्रशिक्षण सल्लागार नीलरत्न चौबळ व महाराष्ट्र व गोवा विभागप्रमुख मनीष शुक्ला, वैभव सुतार, नीलेश चव्हाण उपस्थित होते. कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या मनात आपल्या कमाईतील पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवण्याची प्रबळ इच्छा होती. ही इच्छा शिबिरात अनेकांनी व्यक्त करून दाखविली. आदित्य बिर्ला सनलाइफ एएमसी लिमिटेडचे नीलरत्न चौबळ यांनी सांगितले की, आपण कमावलेल्या पै-पैची कोणाच्या सांगण्यावरून किंवा अर्धवट माहितीवरून डोळेझाकून कोठेही गुंतवणूक करू नका. गुंतवणूक करण्यापूर्वी आपण आपल्या जीवनातील गरजा ओळखा. त्यात प्राथमिकतेनुसार त्या गरजांची गटवारी तयार करा. त्यानुसार आर्थिक नियोजन करा.

गुंतवणुकीची सुरुवात लवकर करा. जेवढ्या लवकर तुम्ही गुंतवणूक कराल, तेवढा तुम्हाला फायदा मिळेल. सध्या नोकरीचा काही भरवसा राहिलेला नाही, तसेच आता खासगी क्षेत्रात सोडाच; पण सरकारी नोकरीतही निवृत्तिवेतन मिळणार नाही. यामुळे निवृत्तीनंतरच्या आयुष्यात पैशाची टंचाई जाणवू द्यायची नसेल, तर म्युच्युअल फंडाशिवाय दुसरा सर्वोत्तम पर्याय नाही, हे त्यांनी विविध व्हिडिओ क्लीप व उदाहरणांद्वारे उपस्थितांना पटवून दिले. म्युच्युअल फंड म्हणजे नेमके काय आहे, मागील २० वर्षांत यात गुंतवणूक करणाऱ्यांना किती लाभ झाला, याची सविस्तर माहिती आदित्य बिर्ला सनलाइफ एएमसी लिमिटेडचे मनीषशुक्ला यांनी दिली. त्यांनी सांगितले की, गुंतवणूक करताना तुम्हाला जोखीम घ्यावीच लागेल.म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे हे जोखमीचे आहे, असे स्पष्टसांगितले जाते, हीच यातील पारदर्शकता आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही तुमचे आर्थिक जीवन अधिक समृद्ध करू शकता. शिवाय जोखीमदेखील थोडी कमी होते. कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक प्रश्नांचे निराकरणही त्यांनी केले. लोकांमध्ये गुंतवणुकीची सवय लागावी या उद्देशाने ‘लोकमत’च्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थित प्रेक्षकांमधून ‘लकी ड्रॉ’ काढून आठ भाग्यवान विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. प्रा. विक्रम काळे यांनी सूत्रसंचालन केले.म्युच्युअल फंडात गुंतवणूक वैविध्यपूर्ण४म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक ही अनेक जागी केली जाते. म्हणूनगुंतवणूक वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यामुळे धोका कमी होतो. समजा,तुमची पूर्ण गुंतवणूक एकाच प्लॉटमध्ये आहे किंवा एकाच कंपनीच्या शेअरमध्ये आहे, फक्त सोन्यातच आहे, अशा वेळेस किमती कमी झाल्यास मोठे नुकसान होते.४ याउलट, तुमची गुंतवणूक वैविध्यपूर्ण असेल तर एका गुंतवणुकीवर संकट आले, तरी तुमचे जास्त नुकसान होणार नाही. झालेले नुकसान दुसरी गुंतवणूक भरूनही काढू शकते. हेच म्युच्युअल फंडाचे वैशिष्ट्य असल्याचे मनीष शुक्ला यांनी सांगितले.सेमिनारला उदंड प्रतिसाद४लोकमत व आदित्य बिर्ला सनलाइफने आयोजित केलेल्या सेमिनारला शहरातील व्यापारी, अधिकारी वर्ग, कर्मचारी व इतरांनी चिकित्सकपूर्ण प्रश्न विचारून आपली उपस्थिती दर्शविली.४सेमिनारला महिला वर्गाने विशेष रुची दाखविली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडLokmatलोकमत