शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

सुश्राव्य गायन, बहारदार नृत्य

By admin | Updated: February 1, 2016 00:32 IST

कलाश्री संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात कलाश्री संगीत विद्यालय आणि राधानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गायन, वादन आणि नृत्याने झाली.

पिंपळे गुरव : कलाश्री संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात कलाश्री संगीत विद्यालय आणि राधानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गायन, वादन आणि नृत्याने झाली.कार्यक्रमाच्या प्रथम पुष्पामध्ये पंडित सुधाकर चव्हाण यांचे शिष्य रवींद्र दामले यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग भीमपलासीमध्ये विलंबित एक तालात ‘अब तो बडी बेर’ ही बंदीश, तर द्रुत त्रितालात ‘जा जा रे अपने मंदिरावा’ ही बंदीश सादर केली.त्यानंतर त्यांनी संत तुकाराम महाराजांचा ‘पद्मनाभा नारायणा’ हा अभंग सादर केला. त्यांना हार्मोनियमवर प्रभाकर पांडव, तबल्यावर रोहिदास कुलकर्णी, पखवाजवर शशिकांत भोसले, तानपुऱ्यावर साथ हरीष सुळे व अतुल गायकवाड आणि टाळासाठी सर्वेश बादरायणी यांनी केली.द्वितीय पुष्पामध्ये स्वरभास्कर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र पंडित श्रीनिवास जोशी यांचे सुश्राव्य गायन झाले. त्यांनी राग पुरिया कल्याणमध्ये विलंबित एकतालात ‘आज सोबना’ ही बंदीश, तर द्रुत त्रितालात ‘बहुत दिन’ ही बंदीश सादर करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.त्यांनी गायनाची सांगता संत ज्ञानदेव महाराजांच्या ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली’ या अभंगाने केली.त्यांना संवादिनीवर साथ अविनाश दिघे, तबलासाथ प्रशांत पांडव, तानपुऱ्यावर साथ हरीष सुळे व अतुल गायकवाड आणि टाळासाठी माऊली टाकळकर यांनी केली.पुष्पामध्ये पं. बिरजूमहाराज यांच्या नात व शिष्या प्रसिद्ध कथक नृत्यांगना रागिणीमहाराज यांनी आपली कला सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी प्रथम बिरजूमहाराजरचित कृष्ण वंदना सादर केली. त्यानंतर त्यांनी त्रितालमध्ये थाट, गत व परण सादर केली. त्यानंतर त्यांनी धमाल तालामध्ये काही रचना पेश केल्या.त्यांना तबल्यावर साथ आशिष मिश्रा, गायन व हार्मोनियम वारीश खान, पढंत रागिणीमहाराज यांच्या गुरू, विदुषी ममतामहाराज, सतारवर अपर्णा देवधर आणि बासरीसाठी रोहित बनकर यांनी केली. त्यांना दाद दिली. नामदेव तळपे यांनी सूत्रसंचालकन केले. अंतिम व चतुर्थ पुष्प पंडित राजा काळे यांच्या गायनाने झाले. त्यांनी प्रथम राग झिंझोटीमध्ये विलंबित एकतालात ‘सावरो मन भायो’ ही, तर द्रुततालामध्ये ‘आओ जी सखी आओ’ ही बंदीश सादर केली. त्यानंतर त्यांनी ‘सुरत पिया की छिन’ हे नाट्यगीत सादर केले. यानंतर त्यांनी ‘विठाई सावळे डोळस रंगा येई वो’ हा अभंग केला. शेवटी त्यांनी पं. जितेंद्र अभिषेकी यांची अजरामर रचना ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ हा अभंग व त्यानंतर ‘परब्रह्म भेटीलागी’ हा अभंग सादर केला. त्यांना संवादिनीवर साथ श्याम जोशी, तबल्यावर प्रशांत पांडव, तानपुऱ्यावर साथ कल्याणी भोसले व योगिनी ढगे यांनी केली. बहारदार महोत्सवाची सांगता झाली. (प्रतिनिधी)